Latest Marathi News
Ganesh J GIF

वाल्मिक कराड आणि गँगविरोधात सर्वांत मोठा पुरावा हाती

'त्या' दिवशीचे व्हिडिओ फुटेज व्हायरल, कराड आणि साथीदारांबरोबर हे पोलिसही अडचणीत?

बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी म्हणजे २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सर्वसामान्य आरोपी एकत्र आल्याचे व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे वाल्मिक कराड आणि साथीदार अडचणीत आले आहेत.

विष्णु चाटे याच्या केज शहरातील कार्यालयात वाल्मिक कराड आला होता. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड याने विष्णू चाटे याच्यामार्फत आवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणात हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा समजला जात आहे. संबंधित व्हिडीओत वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपी एकत्र अल्याचे दिसून येतात. दुपारी १२ वाजताच्या दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. विष्णू चाटे याच्या कार्यालयातील हे सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासांत समोर आले आहे. दुपारी १२ वाजता आरोपींनी एकत्रित बसूनच चाटे याच्या मोबाईवरून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून वाल्मिक अण्णा बोलणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच फोनवर खंडणी मागितल्याचा आरोप आहे. पोलिस एफआयआरमध्येही तसाच उल्लेख आहे. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील हे देखील वाल्मिक कराड यांना भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आवादा कंपनीकडून खंडणी मागितली त्यादिवशी राजेश पाटील हे वाल्मिक कराडला का भेटले असावेत, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता सीआयडी आणि एसआयटीकडून राजेश पाटील यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या सीसीटीव्हीच्या रुपाने खंडणी प्रकरणातला सर्वांत मोठा पुरावा मिळाल्याचे बोलले जाते.

या सीसीटीव्ही फुटेजमुळे खंडणी प्रकरणात जामीन मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वाल्मिक कराड याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराड याच्यावतीने विष्णू चाटे याने आवादा कंपनीकडे तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!