
“पालकमंत्री काय असतो ते दाखवतो,आमच्या नादाला लागू नका”
पालकमंत्र्याचा आपल्याच पक्षातील माजी मंत्र्याला इशारा, शिंदे गटात अंतर्गत धुसफूस?
छत्रपती संभाजीनगर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षातील अंतर्गत वाद सुरूच आहेत. आता सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वादाचा दुसरा अंक सुरु झाला आहे. पण आता मंत्री झालेल्या शिरसाट यांनी सत्तार यांना थेट इशारा दिला आहे.
संजय शिरसाट आणि सत्तार दोघेही एका पक्षात असूनही दोघांमध्ये सतत वाद होत असतो. पण आता एका जाहिर कार्यक्रमात शिरसाट यांच्यावर आक्रमक शैलीत टिका केली ते म्हणाले, ”मी पाचही वर्ष पालकमंत्री राहणार असल्याचं सांगत एकनाथ शिंदे जेव्हा पाठीशी उभे राहतात तेव्हा चिंतेची गरज नाही, असं शिरसाठ म्हणाले. तसेच “कसली गुरमी आणि मस्ती आहे पालकमंत्री काय असतो ते दाखवतो. आमच्या नादाला लागू नका” असे म्हणत संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तारांवर जोरदार टीका केली . शहराला लागलेली कीड आपण संपवलेली आहे आणि दुसरी संपवायची आहे .असं म्हणत शिरसाटांनी इम्तियाज जलील यांच्यासह अब्दुल सत्तारांवरही कडवी टीका केली. तसेच कपटकारस्थान करणाऱ्या माणसाने व्हॉइस चॅट शिंदेंना दाखवत मला मंत्री कसे करू नये असे प्रयत्न झाले. मंत्रीपदाची शपथ घेताना हात लटपट कापत होते. मी मंत्री झालो हे काही जणांच्या पोटात दुखत होते असा दावा देखील शिरसाट यांनी केला आहे.
आलाे तर मंत्री होईल म्हणून माझ्याविरोधात काम केले ते समजू शकतो, पण कन्नडमधून संजना पडली पाहिजे म्हणून प्रयत्न केले. कशाला राजकारण करता असा सवाल देखील शिरसाट यांनी उपस्थित केला. पण सत्तार यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.