Latest Marathi News
Ganesh J GIF

पत्नीच्या अंत्यसंस्काराला पतीची वानराच्या रुपात हजेरी?

अंत्यविधीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, वानराच्या उपस्थितीची जोरदार चर्चा, नेमके काय घडले?

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका गावात वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंतयात्रेला एक वानराने उपस्थिती लावली होती. पण त्याच्या एका कृतीची जोरदार चर्चा होत असून यानिमित्ताने मृत महिलेचा पतीही चर्चेत आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील टेंमुर्डा नजीक असलेल्या पिंपळगाव मारुती येथील अनुसया मारोती धवणे यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले होते. अंत्यसंस्काराची तयारी करत असताना एक वानर आले. अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी होईपर्यंत ते थांबले आणि हे वानर अंत्ययात्रेसोबत स्मशानभूमीतही पोहचले. पण अंतयात्रा स्मशानभूमीत आल्यानंतर वानराने चक्क मृतदेहाच्या जवळ जाऊन बांगड्या फोडल्या, डोक्यावरील पदर काढला मृतदेहाला चक्क मिठी मारून डोळ्यावरील चष्मा काढला. तसेच अग्निसंस्कार होईपर्यंत वानर स्मशानभूमीतच थांबून राहिले. त्यानंतर ते वानर निघून गेले होते. पण अनुसया यांच्या अस्थी आणतानाही वानराने पुन्हा उपस्थिती दाखवली. वानराच्या या वागण्यामुळे गावकरी अचंबित झाले. अनुसया यांचे पती मारुती धवणे यांचे वीस वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यांचे पतीच वानराच्या रुपात अंत्यविधीला आल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वानर अनुसयाच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहिल्यामुळे तिला मोक्ष प्राप्त झाला असेल, अशी गावात व नातेवाईकात चर्चा आहे. वानराचे मृत्यूनंतर भेटायला येणे हा योगायोग की चमत्कार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!