Latest Marathi News
Ganesh J GIF

मी केलेले लग्न हा एक सायकोड्रामा बदनामी थांबवा

शिक्षिका आणि विद्यार्थ्याने लग्न करण्यामागचे धक्कादायक कारण समोर, व्हिडीओ व्हायरल करणारा गोत्यात?

कोलकत्ता – पश्चिम बंगालमधील मौलाना अब्दुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठातून एक विचित्र प्रकार समोर आला होता. येथे एक महिला प्रोफेसर पायल बॅनर्जीने आपल्याच वर्गातील प्रथम वर्गाच्या विद्यार्थ्यासोबत लग्न केले होते. आता अखेर त्या व्हिडिओवर बॅनर्जी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत लग्न केले असे म्हणत संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर विद्यापीठाने प्रोफेसरला सक्तीच्या रजेवर पाठवले होते. पण आता यामागचे खरे कारण समोर आले आहे. या प्रकरणात पायल बॅनर्जी म्हणाल्या, प्रथम वर्गाच्या विद्यार्थ्यासोबत वर्गात लग्नाचा सायकोड्रामा सुरू होता. विद्यार्थ्यांनी मला नवरीची भूमिका वठवण्याची विनंती केली होती. मी त्यांची विनंती मान्य केली. अन्य शिक्षक वर्गाला याबाबत माहिती होती. त्यांनी यासाठी परवानगीही दिली होती. तेव्हा कोणीही आक्षेप घेतला नाही. विद्यार्थ्यांनी कार्ड छापले आणि संपूर्ण गोष्टीचे नियोजन केले. माझ्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आणि मी लग्नाची कृती केली, हे काही गंभीर नव्हते कारण विद्यार्थ्यांनी मला विनंती केली होती. प्राध्यापक आणि विद्यार्थ्याला लग्नासाठी ई-आमंत्रण देण्यात आले होते. आमंत्रणपत्रिकेत ९ जानेवारीला हळदी समारंभ आणि १४ जानेवारीला मेहंदी आणि संगीत समारंभ होता. तर लग्न १६ जानेवारीला होते. जर लग्न १६ जानेवारीला होते. तर लग्नाच्या १५ दिवसानंतर व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांनी शंका उपस्थित केली आहे. तसेच आपल्याला बदनाम करण्यासाठी आपले सहकारी किंवा विद्यार्थ्याने हा व्हिडिओ व्हायरल केला असावा असे सांगत या विरोधात आपण पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला होता. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे, असे कुलगुरू तपस चक्रवर्ती यांनी सांगितले. पण ते म्हणाले की “१६ जानेवारीच्या कार्यक्रमाच्या व्हिडिओने बारा दिवसांनंतर २८ जानेवारी रोजी सोशल मीडियावर व्हायरल होणे, आश्चर्यकारण असल्याचे सांगितले. दरम्यान युनिव्हर्सिटीमधील एक प्रोफेसर सुशांतो काय यांनीही डॉक्टर पायल बॅनर्जी यांचा दावा फेटाळून लावला आहे. शिक्षकांच्या समितीनेही याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तपास समिती या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

पश्चिम बंगालमधील एका विद्यापीठातील महिला प्रोफेसर पायल बॅनर्जी वधूच्या वेशात वर्गात आल्या त्यानंतर त्यांनी वर्गातील विद्यार्थ्यासोबत लग्न केले होते. आता संपुर्ण चाैकशीनंतर काय सत्य समोर येणार हे पहावे लागणार आहे. पण या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!