Latest Marathi News
Ganesh J GIF

संतापजनक! प्रवाशाचा पाय दरवाजात अडकूनही ड्रायव्हर सुसाट

सोशल मिडीयावर निर्दयी ड्रायव्हरचा प्रताप व्हायरल, दरवाजात अडकलेला पाय घेऊन नागरिकाचा प्रवास

सुरत – सिटीबसचा प्रवास दिवसेंदिवस कठीण होऊ लागला आहे. कारण जास्त प्रवाशी आणि अपुरी बस सेवा यामुळे अनेकांना गर्दीत प्रवास करावा लागत आहे. त्यातच कंडक्टर आणि ड्रायव्हरबरोबरचे वाद कायम चर्चेचा विषय असतो. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सध्या अनेक शहरात बीआरटी बस वापरल्या जातात. सध्या सुरतमधील
अशाच एका बीआरटी बसमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते आहे की, एका बीआरटीएस बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा पाय दरवाज्यामध्ये अडकलेला आहे. प्रवाशाचा पाय अडकला असूनही बस भरधाव वेगाने धावते आहे. प्रवाशाची सुटका करण्यासाठी चालक किंवा बसच वाहक कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही. बसमध्ये असलेला कोणताही प्रवासी त्या व्यक्तीच्या मदतीला धावून आलेला नाही. सर्व धक्कादायक घटना बसमधीलच एका प्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ सुरतमधील असल्याचे समजते. व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ‘khushbu_journo’ या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, सुरत बीआसटीएसमधील एका घटनेमध्ये एका प्रवाशाचा पाय बसच्या दरवाज्यात अडकला पण दचालकाने दरवाजा उघडला नाही ज्यामुळे प्रवाशाची गैरसोय झालीच शिवाय त्याचा जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागला.

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काही नेटक-यांनी ”चालकाविरोद्धात कारवाई झाली पाहिजे”तर काहींनी ”बस चालकाला शिक्षा मिळालीच पाहिजे” अशी मागणी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!