Latest Marathi News
Ganesh J GIF

अनोखे पण यशस्वी आंदोलन करणारे सरपंच सोशल मिडियावर हिट

सगळीच आंदोलन हटके कधी नोटा उधळल्या, गाडी जाळली आणि साडीही नेसली, कोण आहेत हे सरपंच?

छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी स्वतःची कार पेटवून देणार, शेतकऱ्यांकडून २० विहिरी खोदण्यासाठी लाच मागितल्यामुळे पंचायत समिती बाहेर २ लाख रुपये उधळणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे त्यांच्या हटके आंदोलनासाठी ओळखले जातात. नुकतेच त्यांनी साडी नेसून आंदोलन केले होते. त्याला मोठे यश मिळाले आहे.

मंगेश साबळे यांनी चक्क साडी नेसून जिल्हा परिषदेच्या कार्यालयात अनोख आंदोलन केले होते. जलजीवन मिशन योजनेचे रखडलेले काम आणि गावात असलेल्या पाण्याच्या समस्येमुळे त्यांनी हे आंदोलन केले होते. प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत लागलीच कामाला सुरूवात केली आहे. पण पुढील आठ दिवसात काम पूर्ण करा असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. मंगेश साबळे यांनी नेहमीच अनोखी आंदोलने केली आहेत. महत्वाचे म्हणजे ती यशस्वी देखील झाली आहेत. याआधीही गेवराई पायगा गावातील दोन ट्रान्सफार्मर जळाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचे हाल होते. महावितरण दखल घेत नसल्यामुळे त्यांनी अंगावरील कपडे काढून अर्धनग्वावस्थेत आळंद येथील महावितरण कार्यालय गाठले होते. त्यांचा हा अवतार पाहून अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. यामुळे तत्काळ प्रशासन यंत्रणा हलली व त्यानंतर दुपारपर्यंत दोन्ही ट्रान्सफार्मर गावात हजर झाले होते. त्यांच्या पैसे उधळलेल्या आंदोलनाची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. मराठा आंदोलनात स्वत:ची गाडी जाळल्यानंतर त्यांच्यावर टीका देखील झाली होती. मंगेश साबळे यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. जालना लोकसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत साबळेंचा पराभव झाला असला तरी त्यांनी १ लाख ५५ हजार मत मिळवली होती. मंगेश साबळेंनी घेतलेल्या मतांचा फटका भाजप नेते रावसाहेब दानवे यांना बसला होता.

मंगेश साबळे हे सर्व आंदोलन यशस्वी करणारे कदाचित पहिलेच नेते असावेत. पण डॅशिंग सरपंच अशी ओळख असलेल्या मंगेश साबळे यांचे नुकतेच लग्न झाले आहे. त्यांचे पत्नीचे नाव ऋतुजा आहे. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नानंतरही साबळे पहिल्यासारखेच आक्रमक आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!