
मोठी बातमी! राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा
या पक्षाने पाठिंबा काढल्याने सरकार कोसळण्याचा धोका, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी, नक्की काय घडले?
मणिपूर – एक मोठी बातमी समोर आली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. विशेष मणिपूर हिंसाचाराला दोन वर्ष झाल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिला आहे. पण यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
गेल्या काही वर्षांपासून मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारामुळे एन. बिरेन सिंह यांना टीकेचा सामना करावा लागत होता. त्यातच कॉनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने पाठिंबा काढून घेतल्यानंतर एन. बिरेन सिंह सरकारला काँग्रेसकडून अविश्वास प्रस्ताव आणि बहुमत चाचणीचा सामना करावा लागू शकतो आणि जर बहुमत चाचणी झाली असती तर भाजपच्या काही आमदार पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. कारण भाजपच्या काही आमदारांनी नेतृत्व बदलाची मागणी होत होती. राज्यातील त्यांच्या नेतृत्वाबद्दल भाजपमधील वाढती असंतोष शांत करण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एन बिरेन सिंह यांनी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि संभाव्य पर्यायांवर चर्चा झाली, त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे एन बीरेन सिंह यांनी आपला राजीनामा देताना राज्यामध्ये तीन महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचाही प्रस्ताव दिला आहे.थोड्याच वेळात विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, ज्यामध्ये पक्षाच्या उच्चायुक्तांशी बोलून नवीन नेता निवडला जाईल. गेल्या वर्षाच्या अखेरीस, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल जनतेची माफी मागितली होती.
मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये दंगली होत होत्या. मणिपूर पेटलेले असताना मुख्यमंत्री काही अॅक्शन घेत नसल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. राज्यातील मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वाढत्या तणावामुळे अनेक हिंसक चकमकी झाल्या. त्यामुळे शेकडो लोकांना प्राण गमावले लागले होते.