
…म्हणून वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर ब्राह्मणच ठरतात’
राहुल सोलापूरकर यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, राज्याभरात संतापाची लाट, घराभोवती सुरक्षा वाढवली
मुंबई – काही दिवसांपूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आग्राहून लाच देऊन निसटले होते, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर मोठा रोष निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी माफी मागितली होती. तो वाद शांत होत असताना आता पुन्हा सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले रामजी सपकाळ यांच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेले एक भिमराव की जो आंबावडेकर नावाच्या एका गुरुजीकडून दत्तक घेतला जातो. त्याच नावावरून पुढे भिमराव आंबेडकर म्हणून मोठे होतात. त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जस म्हटलं आहे, तसं ते अभ्यास करून मोठे झाले आहेत त्या आर्थाने वेदांमध्ये भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केले आहे. दरम्यान राहुल सोलापूरकर याने केलेल्या वादग्रस्त वक्यवानंतर जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. या मनुवाद्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो, हेच समजत नाही. याला दिसेल तिथे तुडवा !! असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे. राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा सचिन खरात यांनी दिला आहे. तसेच अनेकांनी राहुल सोलापूरकर यांच्यावर निशाना साधला आहे. त्यामुळे सोलापूरकर यांच्या घराभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
https://x.com/Awhadspeaks/status/1888523793355747774?t=zgznPz9tjcQ5gITfUR9SVA&s=19
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी विधान केलंय असा. छत्रपती राजर्षी शाहु महाराजांची भूमिका करताना त्यात एका प्रसंगात एक विषय होता, कोण कुठल्या घरात जन्माला आला यावर त्याची जात ठरत नाही. तर तो काय करतो यावर त्याची जात ठरते. मी सर्वांचा आदर्श घेऊन पुढे जात आहे. तरीही हे का केलं जातंय, याबद्दल मी अनभिज्ञ आहे. त्यांच्याविषयी काही अपमानजनक वक्तव्य माझ्याकडून होणार नाही. जर कोणाला तसं वाटत असेल तर मी आताही पुन्हा एकदा जाहीर माफी मागतो , असे राहुल सोलापूरकर म्हणाले आहेत.