Latest Marathi News
Ganesh J GIF

लग्नात त्याला पाहताच नवरी ढसाढसा रडली

नव्या नवरीचा रडतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, आनंदाचे वातावरण झटक्यात बदलेले, बघा नक्की काय झाले?

पुणे – सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात; ज्यात कधी मनोरंजन करणारे, तर कधी आपल्या मनाला भावूक करणारे व्हिडीओ असतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. तो पाहून आपण देखील भावूक व्हाल.

बहीण-भावामधील नाते हे टाॅम अँड जेरीसारखे असते. कितीही भांडले तेरी त्यांच्यात प्रेमही उत्कट असते. त्यामुळेच छोट्या-मोठ्या गोष्टींवरून बहिणीबरोबर वाद घालणारा, तिला चिडवणारा भाऊ बहिणीच्या लग्नात मात्र सर्वांत जास्त रडताना दिसतो. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील याचीच प्रचीती देणारा आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरीला हळद लावण्यात आली असून, माहेरपासून दूर जाणार हे लक्षात आल्यामुळे ती भावनिक झाल्यामुळे डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. यावेळी सर्वांत मागे उभा राहिलेला तिचा भाऊ तिला पाहून पुढे येतो आणि तिला समोर पाहून त्यालाही भरून येतो आणि तो बहिणीच्या गळ्यात पडून रडायला सुरुवात करतो. या दोघांना असं रडताना पाहून आसपासच्या महिलाही रडू लागतात. हा भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @tandel_puja_06 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.  अनेकांनी त्यांच्या नात्याचे काैतुक केले आहे.

अलीकडे लग्नात काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न नव्या नवरी आणि नव-याचा असतो. पण काही क्षण हे सर्वांनाच भावनिक करणारे असतात. नवरी आई वडिलांबरोबरच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त भावाचीच जास्त आठवण येणार असते सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!