
एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची कपडे फाटेपर्यंत हाणामारी
हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, का बोलते म्हणत झिंज्या धरल्या, कपडे फाडले
रांची – नुकताच व्हॅलेंटाईन दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी अनेकांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या असतील. पण सध्या सोशल मिडियावर एका मुलासाठी दोन तरुणींमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मुलीसाठी दोन मुलांमध्ये वाद किंवा हाणामारी झाल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. पण एका मुलासाठी दोन मुलींमध्ये वाद झाल्याची घटना दुर्मिळ समजली जाते. पण सध्या अशाच घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ झारखंडमधील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन्ही मुली भर रस्त्यात एकमेकांशी भांडताना दिसल्या. एका मुलावरून हा वाद सुरू झाला. त्या दोन्ही तरुणी तो त्यांच्याच बॉयफ्रेंड असल्याचं म्हणत होत्या, सुरुवातीला त्यांच्यात वादावादी होते. पण अचानक दोघीही हातघाईवर येतात. दोघीजणी एकमेकींचे केस ओढत आहेत, एकमेकींना लाथा घालत आहेत.. तर मध्येच खाली पाडण्याचा प्रयत्न सुद्धा करतांना दिसून येत होत्या. कमाल म्हणजे स्वतचे कपडे फाटले तरी सुद्धा त्यांना याचे भान नव्हते. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर तरुण मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.मुंबई लोकल ट्रेनमधील सीटवरुन महिलांमधील हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप गाजतात. पण सध्या या तरुणींचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत.