Latest Marathi News
Ganesh J GIF

तुम्ही गुगल पे वापरता का? मग ही बातमी वाचाच

गुगल पेच्या सेवांमध्ये झाला हा मोठा बदल, 'गुगल पे'चा वापरकर्त्यांना मोठा दणका!

मुंबई – आजकाल अनेक जण बिल भरण्यासाठी डिजिटल पेमेंट करत असतात यासाठी गुगल पे सर्रास वापरले जाते. तुम्हीही जण बील किंवा इतर कारणासाठी गुगल पे वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे. कारण गुगल पे ने आपल्या सेवांमध्ये बदल केले आहेत.

अनेक कंपन्यांनी बिल पेमेंटसाठी सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. गुगल पे देखील यात मागे नाही, कारण आता गुगलने वापरकर्त्यांकडून सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी मोफत असलेल्या अनेक सेवांसाठी आता गूगल पे वापरकर्त्यांकडून शुल्क आकारत आहे. वीज, गॅस एजन्सी बिलांसारखी युटिलिटी बिल क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून भरल्यास, वापरकर्त्यांकडून प्रक्रिया शुल्क आकारले जाऊ शकते. फोनपे आणि पेटीएम सारख्या अ‍ॅप्स देखील असेच शुल्क आकारतात. हे शुल्क व्यवहाराच्या रकमेच्या ०.५% ते १% पर्यंत आहे. सध्या, गुगल पेने सुविधा शुल्काबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. महत्वाचे म्हणजे गेल्या वर्षभरापासून Google Pay त्यांच्या वापरकर्त्यांकडून मोबाईल शुल्कावर ३ रुपये सुविधा शुल्क आकारत आहे, अशी माहिती इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालात नमूद केली आहे. अहवालात असे म्हटले आहे की जेव्हा एखादा ग्राहकाने वीज बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करतो तेव्हा अॅपवर वापरकर्त्याकडून १५ रुपये सुविधा शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क अ‍ॅपमध्ये डेबिट/क्रेडिट कार्ड व्यवहारांसाठी प्रक्रिया शुल्क या नावाने दाखवले जात आहे. ज्यामध्ये जीएसटीचाही समाविष्ट आहे.

जागतिक सेवा फर्म PwC नुसार, भागधारकांना UPI व्यवहार प्रक्रियेत ०.२५ टक्के खर्च करावा लागतो. आता असं दिसतंय की, हा खर्च भागवण्यासाठी फिनटेक कंपन्या नवीन महसूल मॉडेल्स स्वीकारत आहेत. UPI व्यवहार आतापर्यंत पूर्णपणे मोफत आहे, UPI वर शुल्क आकारण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे, परंतु आतापर्यंत सरकारने ही सेवा मोफत ठेवली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!