
दिल्ली दि ७ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत.त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणावर घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाकडून शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली तर अगोदर आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. या प्रकरणावर आता २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
जुन मध्ये सुरु झालेली सत्तासंघर्षाची लढाई तीन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु आहे. आज घटनापीठापुढे सुनावणी झाली. यावेळी शिंदे गटाकडून नीरज कौल तर शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाला कार्यवाही करण्यास परवानगी देता येईल का…पक्षाचे चिन्ह वापरण्याबाबत निर्णय व्हायला हवा…असे एकनाथ शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी आज न्यायालयासमोर म्हटले आहे. तर अगोदर आमदार अपात्रतेचा निर्णय घ्या अशी मागणी केली आहे. यावर धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठाने, ‘जेव्हा आम्ही २७ सप्टेंबर रोजी सुनावणी घेऊ तेव्हा काही दिशानिर्देश आवश्यक आहेत का ते ठरवू’, असे नमूद केले. त्यामुळे पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला पुढची सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सारखी लांबणीवर पडत आहे. पुढील सुनावणी मंगळवारी २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.मात्र आता पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना केली होती.त्यामुळे निर्णय प्रक्रियेला गती मिळणार आहे.