Just another WordPress site

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या

हत्येसाठी स्फोट झाल्याचा बनाव, आरोपी अटकेत

जालना दि ७ (प्रतिनिधी) – जालना शहरात  काही दिवसांपूर्वी सिलेंडरच्या स्फोटात एका तरुण वकिलाचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र पतीला मारण्यासाठी पत्नीने सिलेंडरच्या स्फोट झाल्याचा बनाव केल्याचे उघड झाले आहे.पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने आपल्या वकील पतीची हत्या केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

GIF Advt

जालना शहरातील अर्चनानगर भागात १ सप्टेंबर रोजी सिलेंडरचा स्फोट होऊन वकील किरण लोखंडेचा मृत्यू झाला होता. पोलीसांनी पत्नीच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पण तिने दिलेली माहिती आणि घटनास्थळावरील परिस्थिती यात विसंगती आढळल्याने त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा त्यांना आरोपी मनीषाचा बनाव दिसून आला. पोलिसांच्या माहितीनुसार मयत किरण आणि मनीषा मध्ये आदल्या दिवशी वाद झाला. ज्यात मनिषाने आपल्या पतीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार केला. यामुळे पती बेशुद्ध झाला, त्यानंतर तिने त्याचे नाक तोंड दाबून श्वास रोखला. या कामात तिच्या प्रियकराने देखील मदत केली. या नंतर दोघांनी घटनास्थळावरून पोबारा केला.  मात्र एक दिवसानंतर त्यांनी परत येऊन रात्री प्रेतावर अज्ञात केमिकल टाकून ते पेटवून दिले. शिवाय संशय येऊ नये म्हणून गॅस सिलेंडरचा गॅस लिक करून स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जो अयशस्वी झाला होता. मात्र आरडाओरड करून तो झाल्याचा बनाव करण्यात आला होता.

पोलिसांनी या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास केल्याने आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराचा हा बनाव उघड झाला.पोलीसांनी आरोपी पत्नी मनीषा आणि तिचा प्रियकर गणेश याला अटक केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!