Just another WordPress site

शिवसेनेची शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा हुकणार?

उद्धव ठाकरे गटाला शिंदे गट मोठा धक्का देण्याच्या तयारीत

मुंबई दि ७ (प्रतिनिधी) – शिवसेना नेमकी कुणाची हा वाद सुप्रीम कोर्टात सुरू असतानाच, शिवसेनेच्या दसरा मेळ्यावरून पुन्हा शिंदे आणि ठाकरे असा राजकीय संघर्षाची शक्यता आहे. शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा घेण्याबाबत शिंदे गट आक्रमक असून मेळाव्यासाठी कोणालाच परवानगी देऊ नका, अशी मागणी शिंदे गट करणार आहे. यासाठी न्यायालयाचा दरवाजा शिंदे गट ठोठावणार आहे.

GIF Advt

शिवतीर्थावर मैदानावर दरवर्षी शिवसेनेकडून दसरा मेळावा घेण्यात येतो. या मेळाव्याला राज्यभरातून हजारो शिवसैनिक येत असतात. पण यावर्षी या मेळाव्यावर फुटीवर सावट आहे. तरीपण यावर्षी सुद्धा शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेकडून अर्ज करण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून सुद्धा दसरा मेळाव्यासाठी अर्ज करण्यात आला आहे.पण दसरा मेळाव्यासाठी आधी ज्याने अर्ज केला त्याला परवानगी देण्याची भूमिका महापालिका घेऊ शकते. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून आधी अर्ज करण्यात आलाय. त्यामुळे त्यांना परवानगी मिळू शकते. असे झाल्यास शिवसेना कोणाची हे सिद्ध करण्यासाठी ठाकरेंकडे पुरावा मिळू शकतो यासाठी शिवतीर्थ कोणालाच मिळू नये यासाठी शिंदे गट प्रयत्न करणार आहे.

दसऱ्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांना ऐकण्यासाठी शिवतीर्थ गर्दीने तुडूंब भरलेले असायचे. शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द ना शब्द कानात साठवून ठेवायचे. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी दिलेला आदेश हा शिवसैनिकांसाठी कायमच प्रमाण होता. पण यंदा मात्र दसरा मेळावा कसा होणार याची उत्सुकता शिवसैनिकाबरोबर सर्वांनाच असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!