Latest Marathi News
Ganesh J GIF

कोर्टासमोरच सासू सुनेची एकमेकींच्या झिंज्या ओढत हाणामारी

फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, महिलांच्या भांडणाचा पुरुषांनाही त्रास

नाशिक – अनेक घरात सासू सुनांचे वाद नवीन नाहीत. अनेकदा तर ते अतिशय टोकाचे होतात. पण सासूमुळे घटस्फोट होणे तसे दुर्मिळच! पण नाशिकमध्ये सासूमुळे घटस्फोट होण्याची घटना समोर आली आहे. यावेळी कोर्टाबाहेर सासू सुनेची फ्री स्टाईल हाणामारी देखील पहायला मिळाली.

नाशिकच्या जिल्हा न्यायालयाच्या बाहेर दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यायालयाच्या गेटवर कौटुंबिक वादतून सासू-सून आणि कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी आणि बाचाबाची झाली. मिळालेल्या माहितीनुसार, सासू यमूना यशवंत निकम आणि सुनेचा भाऊ दीपक हिरामण साळवे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी या भांडणात उडी घेतली आणि हाणामारी सुरु केली. यावेळी महिला केस ओढत एकमेकांना मारत होत्या तर पुरुष मंडळी हातांनी, पायांनी मारहाण करत होते. लोकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी सरकारवाडा पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात नेले. यादरम्यानही दोन्ही गटाचे लोक एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरगुती वादातून झालेल्या सासू सुनेच्या मारामारीत पुरुषांसह महिलादेखील एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले.

न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर सासू सुनेची अशी फ्रीस्टाइल मारामारी झाल्याने, ही घटना दिवसभर न्यायालयाच्या चर्चेचा विषय बनली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी यावर प्रतिक्रिया देखील देत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!