
….म्हणून मला आत्महत्या करावीशी वाटतेय
व्हायरल तरूणीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, या लोकांची नावे घेत दिली आत्महत्येची धमकी
प्रयागराज – महाकुंभात अनेक साधू आणि साध्वी व्हायरल झाले. अशीच एक साध्वी म्हणजे हर्षा रिछारिया, जिची कुंभमेळ्याच्या सुरुवातीला खूप चर्चा झाली होती. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण नंतर ती साध्वी नाही हे समोर आले होते.
हर्षा रिचारिया हिने मंगळवारी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आत्महत्येची धमकी दिली. ती म्हणाली, काही ‘धर्मविरोधी’ लोक त्यांचे व्हिडिओ AI वापरून एडिट करून तिची बदनामी करत आहेत. ती म्हणाली, “मला खूप मेसेज आणि मेल येत आहेत ज्यात माझी बदनामी केली जात आहे. काही लोक माझे बनावट व्हिडिओ बनवून व्हायरल करत आहेत. गेल्या १०-१५ दिवसांपासून दररोज सतत २५-३० मेसेज येत आहेत. लोक म्हणत आहेत की तुमचे बनावट केले जात आहेत. तुमची बदनामी होत आहे. असे करणाऱ्यांवर कारवाई करा. माझ्याकडे सर्वांची नावे आहेत. जर कोणत्याही सकाळी हर्षा रिचारियाने आत्महत्या केल्याचे कळले तर माझ्याकडे सर्वांची नावे आहेत. माझ्याशी कोणी काय केले याची सर्व नावे मी लिहून ठेवेन” असा इशारा तिने दिला आहे.
हर्षा रिचारिया एक मॉडेल आहे. जी नुकत्याच झालेल्या महाकुंभ मेळ्यात रथात बसल्यामुळे चर्चेत आली होती. ती निरंजनी आखाड्याच्या मिरवणुकीत संतांसोबत रथावर बसलेली दिसून आली होती. आता यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.