
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा …..
नवरा बायकोने असे काही केले की सगळे पाहतच राहिले, व्हिडिओ व्हायरल, एकदा बघाच!
पुणे – पत्नी- पत्नीचे नाते कायमच वेगळे असते. प्रेम विश्वास हे दोन सूत्र त्यांच्या जीवनात नवीन रंग भरत असतात. पण जर दोघांमध्ये वाद झाले तरी सर्व घरामध्ये अशांतता निर्माण होते. अश्या याचीच अनुभूती देणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नवरा-बायकोचे नाते आनंदी असल्यास दोघही आयुष्याचा आनंद कसा लुटतात हे सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसून येत आहे. अलीकडे कोणताही कार्यक्रम असो डान्स हमखास होत असतात. घरातला कार्यक्रम असेल तर महिलाही डान्स करताना दिसतात. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की,नवरा बायकोनं स्टेजवर मराठी चित्रपट ‘नवरी मिळे नवऱ्याला’मधील ‘ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली, ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली, हिचा नखरा पाहून काळीज उडतंय, हो धक-धक, धक-धक’ या गाण्यावर डान्स केला आहे. दोघही इतके जबरदस्त नाचले आहेत की, तुमचीही नजर हटणार नाही. या व्हिडिओमधल्या नवरा बायकोच्या डान्स पाहून कोणीही विश्वास ठेवणार नाही की ते पहिल्यांदा डान्स करत आहेत. त्यातील नवरीचा डान्स पाहून तर अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत जोरदार दाद दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ vaidehi0103 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरीही व्हिडीओ पाहून कौतुक करत आहेत.
अलीकडे लग्न किंवा कार्यक्रमात डान्स असतोच असतो त्यात महिला हिरहिरीने भाग घेतात. एखादी वहिनी दिराच्या लग्नात झोकात डान्स करते तर कधी कधी नवरीच ताल धरताना दिसते. असे व्हिडिओ देखील चांगलेच व्हायरल होत असतात.