
धक्कादायक! बलात्कार करणारा दत्ता गाडे समलैंगिक संबंध ठेवायचा
स्वारगेट अत्याचार प्रकरणात ट्वीस्ट, पोलिसही चक्रावले, पत्नी म्हणाली तिचे कपडे फाटले का?
पुणे – स्वारगेट बसस्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे दत्तात्रय गाडे या नराधमाने एका तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. पण आता या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत असल्यामुळे प्रकरणाचा गुंता वाढत चालला आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वकिलांनी दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा करून या प्रकरणाला वेगळेच वळण दिलं आहे. आरोपीच्या वकिलांनी हा प्रकार पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन झाला असल्याचे सांगितल्याने या संपूर्ण घटनेबाबच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे दत्ता गाडेच्या पत्नीने देखील काही प्रश्न विचारल्यामुळे प्रकरणात ट्विट आला आहे. ती म्हणाली, मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला पण न्याय पाहिजे. ती मुलगी म्हणतेय की माझ्या नवऱ्याने बलात्कार केलाय. बलात्कार केलाय पण तिचे कपडे कुठे फाटलेत का? तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं दिसतंय का? बसमध्ये चढताना आधी तरुणी गेली मग माझा नवरा गेला. त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का? असा सवाल उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे आरोपी दत्तात्रय गाडेचा प्रेमविवाह झाल्याचे समोर आले असून तो समलैंगिक संबंध ठेवत असल्याचे समोर आले आहे. आरोपी कोणताही कामधंदा करत नसल्यामुळे पत्नीशी व कुटुंबीयांशीही त्याचे वाद सुरू होते. पैसे कमावण्यासाठी तो गेल्या काही महिन्यांपासून तो समलैंगिक संबंध ठेवत होता. यातून त्याला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात तपासावे मोठे आव्हान पोलीसांसमोर असणार आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बलात्काराच्या घटनेनंतर अत्यंत बारकाईने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या आहेत. न्यायालयाने नराधम आरोपी दत्ता गाडेला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.