
लग्नासाठी फोटोशुट करताय मग ही बातमी वाचाच!
नवीन जोडप्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, शुट करताना नवरीसोबत काय घडल?
पुणे – सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सध्या सोशल मिडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते पाहिल्यावर तुम्ही देखील विचार कराल.
अलीकडे लग्नाचे फोटोशूट करणे अगदी ट्रेंड बनत चालला आहे. लग्न हा मुला-मुलीच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. अलीकडे प्रत्येकजण हे क्षण कॅमेरात कैद करुन ठेवतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या थीममध्ये लोक फोटोशूट करतात. दरम्यान सध्या असाच एक फोटोशूटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही क्षणांत आंनदाचे वातावरण दुख:त बदलले आहेत. फक्त सुदैवाने जीवितहानी झाली नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, लग्नाचा परिसर दिसून येत आहे. छान असे गुलाबी पांढऱ्या रंगाचे डेकोरेशन केले आहे. नवरा-नवरी तयार होऊन फोटोशूट करत आहेत. वराने वधूला उचलून घेतले आहे. या फोटोशूटदरम्यान वेळी मागच्या बाजूने रंगांचा बॉम्ब फोडला जातो, पण अचानक तो बॉम्ब जाऊन वधूच्या पाठीला लागतो. यामुळे वधूला भाजते. हा प्रकार बंगळूरमध्ये घडलेला आहे. एक नवविवाहित जोडपे फोटोशूट करत असताना गंभीर अपघात घडला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. @viaparadise नावाच्या अकाऊंटने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये असे लिहिले आहे, ”आमच्या योजनेनुसार, रंगीत बॉम्ब मागे फुटणार होता, परंतु तो थेट आमच्यावरच फुटला. आम्ही आमच्या मुलाला आमच्याबरोबर घेऊन जाणार होतो, जर तो आमच्याबरोबर असता तर काय झाले असते याचा विचार करा.
या व्हिडिओमध्ये, वधूच्या पीठावर जळलेल्या खुणा दाखवल्या आहेत. जोडप्याने त्यांच्या पोस्टमध्ये लोकांना इशारा दिला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.