
पोलीसांसमोरच बाॅक्सर पत्नीने केली पतीची जोरदार धुलाई
गळा दाबून केलेल्या हाणामारीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल, गुन्हा दाखल, नेमके प्रकरण काय?
हिसार – बॉक्सर आणि विश्वविजेती स्वीटी बोरा आणि तिचा पती आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू दीपक हुडा यांच्यातील भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या समोर आलेल्या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे.
भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार दीपक हुड्डा यांनी महिला पोलिस ठाण्यात त्यांची पत्नी आणि बॉक्सर स्वीटी बोरा, तिचे वडील महेंद्र सिंग आणि मामा सत्यवान यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. ही घटना हरियाणातील हिसार येथील महिला पोलिस स्टेशनमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. सध्या व्हायरल झालेला व्हिडिओ १५ मार्चचा असल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओत दिसत आहे की, सुरुवातीला पोलिस ठाण्यात दोघांमध्ये वाद होतो. मग अचानक स्वीटी तिच्या खुर्चीवरून उठते आणि दीपकचा गळा दाबू लागते. जवळ उभे असलेले कुटुंबातील सदस्य हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यानंतर पोलिसांनी स्वीटी बोरा, तिचे वडील महेंद्र आणि मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जर मला काही झालं तर तिचा पती दीपक हुडा आणि हिसारचे पोलिस अधीक्षक तिच्या मृत्यूसाठी जबाबदार असतील, कारण पोलिसांनी तिच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यालाच त्रास दिला जात आहे, असं स्वीटी बोरा हिने म्हटलं आहे.
हुडा आणि बुरा यांच्यात वाद सुरू आहे ज्यामध्ये बुरा यांनी हुडाविरुद्ध हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला आहे तर हुडा यांनी बुराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.