Latest Marathi News
Ganesh J GIF

दोन महिन्याचा शुभम इशान्याचा संसार दहशतवादी हल्ल्यात उद्धवस्त

दोन महिन्यापूर्वीच झाले होते लग्न, धर्म विचारून कलमा म्हणायला लावला, पत्नीसमोर शुभमला मारले

श्रीनगर – जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांची हत्या केली. या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागला यात आपल्या पतीच्या मृतदेहासमोर बसून रडणाऱ्या पत्नीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यांची आता दुखद माहिती समोर आली आहे.

काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात प्रत्यक्षदर्शींचे फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. दरम्यान एक हृदय पिळवटून टाकणारा फोटो समोर आला आहे. एक नवविवाहिता मधुचंद्रासाठी पहलगाम या ठिकाणी गेली होती. तिचा नवरा गोळीबारात ठार झाला आहे. त्याच्या मृतदेहाजवळ ती स्तब्ध बसून आहे. तिचा हा मूक आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा ठरला आहे. हा फोटो पाहून प्रत्येकाच्याच काळजात धस्स होतं आहे. शुभम द्विवेदी यांच्या पत्नीचा हा फोटो आहे. इशान्या असं तिचं नाव आहे. या दोघांचंही लग्न दोन महिन्यांपूर्वी झालं होतं. शुभमचे वडील संजय द्विवेदी हे सिमेंट व्यावसायिक आहेत. शुभम आणि त्याची पत्नी बुधवारी म्हणजेच आज घरी परतणार होते. मात्र मंगळवारी शुभमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्याला ठार केलं. ज्यानंतर शुभमची पत्नी दहशतवाद्यांना म्हणाली मलाही मारुन टाका. मात्र दहशतवादी म्हणाले तुला जिवंत सोडतोय तुमच्या सरकारला जाऊन सांग आम्ही काय केलं आहे. शुभम आणि त्याच्या पत्नीने दुपारी १ च्या सुमारास हॉटेल सोडलं. त्यानंतर ते घोडेस्वारीसाठी गेले होते. त्यांच्याबरोबरचे कुटुंबीय हॉटेलमध्ये थांबले होते. शुभम आणि त्याची पत्नी फिरायला गेले होते. पत्नीसोबत बसून मॅगी खात होता, तेव्हा एक अनोळखी व्यक्ती त्याठिकाणी आला. शुभमच्या पत्नीने कुटुंबातील सदस्यांना सांगितले की, त्या व्यक्तीने प्रथम शुभमचे नाव विचारले आणि नंतर त्याला कलमा म्हणण्यास सांगितले. शुभमने त्याला तिथून निघून जाण्यास सांगितले, तेव्हा त्याने बंदूक काढून शुभमच्या डोक्यावर ठेवली आणि डोक्यात गोळी झाडली. शुभमला पत्नीच्या डोळ्यांदेखतच दहशतवाद्यांनी ठार केले. शुभमचा भाऊ मनोज याने ही माहिती दिली आहे. दरम्यान लग्नानंतर शुभम आणि एशान्याची ही दुसरी ट्रिप होती आणि यावेळी त्यांनी कुटुंबियांसोबत फिरण्याचं ठरवलं होत. शुभम आणि एशान्याचे कुटुंबीयसुद्धा या ट्रिपमध्ये सहभागी होते.

 

काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळ्या झाडल्या आहे. २६ पर्यटकांचा मृत्यू झालं आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. गेल्या सहा वर्षातील काश्मीरमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. धर्म विचारत हा हल्ला करण्यात आला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!