
काश्मीरला जाण्यापूर्वी ‘कलमा’ शिका, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील
प्रसिद्ध बाॅलीवूड अभिनेत्रीला पाकिस्तानी मित्राची धमकी, खळबळजनक वक्तव्यामुळे जोरदार चर्चा
मुंबई – बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री पायल घोषने नुकताच एक खळबळजनक दावा केला आहे. या विधानामुळे सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय बनली आहे.
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात २६ जणांना आपले प्राण गमावावे लागले. यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना कलमा म्हणायला सांगितला, पण ज्याला तो म्हणता आला नाही, त्यांची हत्या केली. यानंतर देशभरातुन संताप व्यक्त होत आहे. आता यावरून अभिनेत्री पायल घोष हिने गाैप्यस्फोट केला आहे ती म्हणाली तिच्या एका पाकिस्तानी अभिनेता मित्राने तिला काश्मीरला जाण्यापूर्वी ‘कलमा’ शिकण्याचा सल्ला दिला, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. या सर्व घटनांमुळे पायल घोष पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या या विधानांवर विविध प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी तिच्या धैर्याचे कौतुक केले आहे, तर काहींनी तिच्या वक्तव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसे पहायला गेले तर पायल घोष नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. तिने अनुराग कश्यपवर देखील आरोप केले होते. मध्यंतरी कश्यप यांनी ब्राम्हणांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पायलने एक पोस्ट शेअर करत अनुराग कश्यप यांना बॉलिवूडपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट टाकून लिहिले, ‘बॉलिवूडपासून दूर जाणे आणि तिथून निघून जाणे हे एक चांगले पर्याय आहे अनुराग कश्यप. बॉलिवूड तुमच्याशिवाय आनंदी आहे, त्यामुळे इथून दूर राहा. कर्म वाईट असेल, तर फळही वाईटच मिळेल, अशा शब्दात तिने कश्यप यांच्यावर टिका केली होती. दरम्यान याला २०२० च्या वादाची किनार होती, कारण २०२० मध्ये अभिनेत्री पायल घोष यांनी अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.
पायल घोष राजकारणात देखील होती. तिने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अठावले) च्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच आपला मृत्यू झाला तर आपण अनेकांना अडकवून जाऊ असे म्हणाली होती, तसेच आपल्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांचाही उल्लेख तिने केला होता.