Latest Marathi News
Ganesh J GIF

गुड न्यूज! मान्सूनचा पाऊस ‘या’ तारखेला महाराष्ट्रात बरसणार?

वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण, यंदा इतक्या टक्के पावसाचा अंदाज

मुंबई – उकाड्याने सर्वांच्या अंगाची लाहीलाही होत असताना हवामान विभागाने नागरिकांना आनंदाची बातमी दिली आहे. कारण मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे शेतकरी मात्र आनंदित झाला आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार, १३ मेपर्यंत मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होईल. त्यानंतर ५-६ दिवसांत केरळमध्ये म्हणजेच १८-१९ मे दरम्यान मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रातही मान्सून ५ ते ७ जूनदरम्यान दाखल होऊ शकतो, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरवर्षी मान्सून महाराष्ट्रात ९ ते ११ जूनच्या दरम्यान दाखल होतो. पुण्यात १० जून तर मुंबईत ११ जून ही नेहमीची तारीख मानली जाते. मात्र यंदा मान्सूनचं आगमन लवकर होण्याच्या शक्यतेमुळे दक्षिण कोकणात ५ जूनपासून तर मुंबई-पुण्यात ७ ते ८ जूनपर्यंत मान्सून पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावर्षी लवकर मान्सून दाखल होणार असल्याने पाणीपातळीत लवकर वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या अनेक भागात पाण्याची बिकट अवस्था आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळं शेतीसाठी, पिण्यासाठी जनावऱ्यांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. असा स्थितीत जर मान्सून लवकर दाखल झाला तर शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. यावर्षी पन्नास दिवस देशभरामध्ये उष्णतेची लाट सक्रिय होती. त्यामुळे हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील पाणी प्रचंड तापले होते. बाष्पीभवनाचा वेग वाढल्यामुळे संपूर्ण देशाभोवती बाष्पयुक्त ढग तयार झाले आहेत. याच कारणामुळे मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, यावेळी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जास्त पाऊस पडू शकतो. यावेळी ला निना किंवा एल निनोसारखी परिस्थिती राहणार नाही, म्हणजेच बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तटस्थ परिस्थिती असेल.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने हंगामी पावसाचा अंदाज दीर्घकालीन सरासरीच्या १०५% इतका वर्तवला आहे. नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये सुरू होतो आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत माघार घेतो. यंदा एल निनोचा प्रभाव नसल्याने आणि ला निना सारख्या अनुकूल वातावरणामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!