Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! अनैतिक संबंधातून पत्नीने केला पतीचा खून

खून करुन रचला अपघाताचा बनाव, असा झाला खुनाचा उलगडा, हे ठरले कारण

कोल्हापूर – अलीकडे अनैतिक संबंधाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या वादातून पतीचा खून झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता कोल्हापूर मधून अशीच एक घटना घडली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने शेतकरी पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

शिवाजी बंडू शिंदे असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी कांचन शिवाजी शिंदे आणि तिचा प्रियकर चुलत दीर चंद्रकांत धोंडिबा शिंदे यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत त्यांची आई शकुंतला बंडू शिंदे यांनी मुरगूड पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, शिवाजी शिंदे यांना दोन विवाहित मुली आणि नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेला एक अविवाहित मुलगा आहे. पत्नी माहेरी असल्याने सध्या ते वडगाव येथे एकटेच राहत होते. शनिवार सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास शिवाजी शिंदे हे वडगाव ते माद्याळ रस्त्यावरील काशी नाका येथे मृत अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर मारहाणीच्या जखमा होत्या. ग्रामस्थ व पोलिस पाटील यांनी मुरगूड पोलिस ठाण्यास याबाबत कल्पना दिली. सुरुवातीला हा अपघात झाला असावा असे सर्वांना वाटले. पण घटनास्थळाची परिस्थिती पाहून पोलिसांनी चौकशी केली असता हा खून असल्याचे स्पष्ट झाले. मृत शिवाजी याने फायनान्स कंपनीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल केली होती. या आर्थिक देवाण-घेवाणीतून पत्नी आरोपी कांचन हिच्यासोबत त्यांचे वारंवार वाद होत होते. गुरुवारी कापशीतील कामे संपवून शिवाजी वडगावकडे गेले होते. एकादशीनिमित्त वडगाव येथील मंदिरात भजन सुरू होते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ते मंदिराजवळच थांबले होते, असे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारी रात्री अकरानंतर शिवाजी हा चुलतभाऊ आरोपी चंद्रकांत याच्या गाडीवरून गेला असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी चंद्रकांत याला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. दोघांनी शिवाजीला निर्जनस्थळी नेऊन लाकडी ओंडक्याने मारहाण करून त्याचा खून केला. आरोपींनी पुरावा व ओळख नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह वडगाव येथील काशी नाका येथे रस्त्याकडेला टाकला असल्याचे पोलिसांना सांगितले.

मुरगूडचे पोलिस निरीक्षक शिवाजी करे व पोलिसांनी आठ तासात खुनाचा छडा लावून आरोपी कांचन व आरोपी चंद्रकांत शिंदे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!