
कमालच! भर लग्नात नव्या नवरीचा संताप अनावर
नवरीच्या संतापाचा व्हिडिओ व्हायरल, मंडपातच का रागावली नवरी?, एकदा बघाच!
दिल्ली – सध्याच्या काळात कोणतेही लग्न डान्सशिवाय अपूर्ण आहे. लग्न म्हटले की हमखास नवरा किंवा नवरीचा डान्स असतोच पण सध्या मात्र सोशल मिडीयावर या डान्समुळेच एका संतापलेल्या नवरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ती कोणावर संतापली होती तेच आपण जाणून घेणार आहोत.
सध्या सोशल मीडियावर लग्नामधील व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नेटकऱ्यांनादेखील लग्नामधील व्हिडीओ बघायला प्रचंड आवडते. लग्नामधील व्हिडीओमध्ये नवरदेव आणि नवरीच्या व्हिडीओंना खूप पसंती दिली जाते. अलीकडे नवरदेव एंट्री घेत असताना नवरी डान्स करत अनेकांना सुखद धक्का देत असते. पण याच कारणामुळे एक नवरी कमालीची संतापली होती. व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, जेव्हा वधू फुलांच्या वर्षावात पूर्ण थाटामाटात प्रवेश करीत होती, तेव्हा डीजेवाल्याकडून चुकीचे गाणे वाजवले गेले. त्यामुळे तिचा चेहरा पडला. हे गाणे नाही आहे, असे ती वारंवार सांगत होती. तरीही लग्नमंडपामध्ये चुकीचेच गाणे सुरू होते. अखेर तिने हाताने इशारा करीत हे गाणे नाही आहे, असे सांगितले. पण तरीही डीजेने गाणे थांबवले नाही आणि त्यामुळे वधूचा राग आणखी स्पष्ट झाला. वधूच्या या लटक्या रागाने लग्नाच्या हॉलमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुरूवातीला पाहुण्यांना काय झाले हे समजलेच नाही, अखेर खरे कारण समोर आल्यावर अनेकांना हसू आवरणे कठीण झाले होते. पण या सर्व प्रकारामुळे नवरीचा मात्र चेहरा पडला होता. बहुतेक नवरीला डान्स करायचा होता, पण चुकीचे गाणे वाजल्यामुळे तिची योजना पूर्ण होऊ शकली नाही.
हा व्हिडिओ लाईफ विथ अदिशा या इन्स्टा पेजवरून शेअर करण्यात आला आहे. याला आत्तापर्यंत अनेकांनी पाहिले असून मजेरीश कमेंट केल्या आहेत. अनेकांनी डीजेवाल्यामुळे नवरीचा हिरमोड झाल्याबद्दल दुख व्यक्त केले आहे.