
मोठी बातमी! अजित पवार गटाचे सात आमदार फुटले
अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का, या पक्षात केला प्रवेश, पक्षाची मान्यताच धोक्यात?
दिल्ली – आत्ताच्या घडीला देशात सर्वात मोठी राजकीय घडामोड झाली असून सत्ताधारी अजितदादा पवार गटाचे सात आमदार फुटले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. अर्थात ही घडामोड महाराष्ट्रात नाही तर नागालँडमध्ये झाली आहे.
नागार्लंडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) सर्व सात आमदार सत्ताधारी पक्ष नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) मध्ये सामील झालेत. या विलीनीकरणामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील एनडीपीपीला ६० सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले आहे. राष्ट्रवादीमधील फूटीनंतर नागार्लंडमधील आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष भाजपने १२ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. नागालँड विधानसभा सदस्य (पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रता) नियम, 2019 नुसार, सभापतींनी विलीनीकरणाला मान्यता दिली आणि त्यानुसार पक्ष संलग्नता नोंदी अद्यतनित करण्याचे निर्देश विधानसभा सचिवालयाला दिले, असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या “राष्ट्रीय पक्ष” म्हणून अधिमान्यतेला धोका निर्माण झाला आहे.
नागालँड विधानसभेत आता एनडीपीपी ३२ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाला स्वबळावरून बहुमत मिळाल्याने त्यांना सत्तेसाठी कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही. मात्र, सध्या त्यांच्यासोबत भाजपचे १२ आमदारही आहेत.