
कमेंट केल्यामुळे बेदम मारहाण करत थारने चिरडण्याचा प्रयत्न
दगड विटांनी मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, या कारणामुळे केली मारहाण?
नोएडा – आजकाल अनेक जण सोशल मिडीयाचा वापर करत आहेत. सोशल मिडीयामुळे अनेकांना फायदा झाला आहे. पण या सोशल मिडीयाचे जसे फायदे आहेत. तसे तोटे देखील आहेत. अशीच एक घटना नोयडात घडली आहे. कारण कमेंट केल्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
साैरभ यादव असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो जमीन विक्री खरेदीचा व्यवसाय करतो. ही संपूर्ण घटना २ जून रोजी दुपारच्या सुमारास सेक्टर ५३ पोलिस स्टेशन सेक्टर २४ परिसरातील घडली आहे. साैरभने मारहाण करणाऱ्यांच्या पोस्टवर कमेंट केली होती. पण ही कमेंट त्यांना अजिबात आवडली नाही. आणि त्यांनी साैरभ आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण केली. यावेळी दगड विटांनी साैरभला मारहाण केली. एवढेच नाहीतर त्यानंतर थार गाडी अंगावर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात साैरभ आणि त्याचा भाऊ गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पोलीसांनी व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख केली आहे. आकाश, अमन, गौरव आणि कुणाल अशी त्यांची नावे आहेत. ते सध्या फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.