
माहेरहुन चार लाख रुपये आण, सासरच्या लोकांचा जाच
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, सासरच्या छळाला शुभांगी त्रासली
बीड – राज्यात वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर राज्यातील अनेक हुंडाबळीची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात आजही जुनाट विचारांचे स्तोम माजल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता बीडमध्ये देखील एक हुंडाबळीची घटना समोर आली आहे.
शुभांगी संतोष शिंदे असे मृत विवाहित महिलेचं नाव आहे. महिला आपल्या सासरच्या मंडळींसोबत अंबाजोगाई तालुक्यातील गीता गावात राहत होती. तिने सासरच्या मंडळींनी केलेल्या छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. गित्ता येथील संतोष शिंदे याच्या सोबत मे २०२२मध्ये झाला. विवाहानंतर एक वर्ष शुभांगीला चांगले नांदवले. मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींनी व्यवसाय करण्यासाठी सातत्याने पैशांची मागणी केली. शुभांगी शिंदे या मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी, माहेरच्या लोकांनी पाच लाख रुपये देऊनही आणखी चार लाख रुपयांसाठी शुभांगी शिंदे हिचा छळ सुरू होता असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तिला अपमानजनक वागणूक दिली जात होती. सासरच्यांकडून सातत्याने सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून शुभांगीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी शुभांगीचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणात शुभांगीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पतीसह सासू-सासरे आणि नणंद यांनी हुंड्यासाठी छळ केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान २२ मे २०२२ या दिवशी शुभांगीचा मोठ्या थाटात विवाह लावण्यात आला होता. त्याच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस १५ दिवसांपूर्वीच झाला होता; परंतु या छळामुळे शुभांगीला या दिवसाचा आनंद लुटता आला नाही.
या प्रकरणात पती संतोष शिंदे, सासरे विलास शिंदे,सासु सुमन शिंदे,ननंद सीमा शिंदे व पतीचे मित्र संदीप काचगुंडे यांच्या विरोधात भाऊ प्रदीप सोळंके याच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील पती,सासू-सासरे,ननंद यांना पोलिसांनी अटक केली आहे.