
शिंदे गटात जाणं ही माझी मोठी चूक, रात्रभर झोप येत नव्हती
शिंदे गटातील बड्या नेत्याचा पुन्हा ठाकरे गटात प्रवेश, शिंदे गटाबाबत मोठा गाैप्यस्फोट
मुंबई – शिंदे गटाकडून ठाकरेंचे खासदार आपल्याकडे वळवण्यासाठी आॅपरेशन टायगर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात जात असताना एक महिला नेत्याने शिंदे घटातून पुन्हा एकदा ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
सुजाता शिंगाडे या ठाकरे गटात महिला विभाग संघटक पदावर कार्यरत होत्या. त्यांनी जानेवारी महिन्यात ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता. पण शिंदे गटात कोणाशीच ताळमेळ नाही. तिथे अंदाधुंद कारभार चालला असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी शिंगाडे म्हणाल्या की, जानेवारी महिन्यात शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, त्या ठिकाणी जनतेची कामे झाली नाहीत, आम्हाला वेळ दिला नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वेळ दिला नाही. खरी शिवसेना ही मातोश्रीची आहे. मी शिंदे गटामध्ये जाऊन चूक केली. शिवसेना सोडल्यानंतर मला रात्रीची झोप लागली नव्हती. हे सर्व कोटींच्या घरात पैसे देऊन घेत आहेत. सगळ्यांनाच शिंदे गटात त्रास होत आहे’, असा खुलासा त्यांनी केला. त्याचबरोबर आपण फार मोठी चूक केलेली आहे. हा सर्व देखावा आहे. आणि जे नगरसेवक घेत आहेत पैसे देऊन २ कोटी, ३ कोटी असे लोक बोलत आहेत. पण त्या लोकांनाही नक्कीच तिथे पश्चाताप होतोय. काही पदाधिकारी तर माझ्याशी याबाबत बोलले होते. असा गाैप्यस्फोट शिंगाडे यांनी केला आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे असेल, तेच होईल असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसे व ठाकरे गटाच्या युतीवर सकारात्मकता दाखवली आहे.
सुजाता शिंगाडे या गेली ३५ वर्षे ठाकरे गटात कार्यरत होत्या. गटप्रमुख,चारकोप महिला शाखा प्रमुख, महिला उपविभाग संघटक ते विभागसंघटक अशा संघटनात्मक पदांवर त्यांनी काम केले होते. पण अचानक त्यांनी ठाकरे घटातून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.