Latest Marathi News
Ganesh J GIF

…म्हणुन पत्नीला जाळून मृतदेहाची राख समुद्रात फेकली

पत्नीची हत्या केल्याप्रकरणी या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला पोलीसांच्या बेड्या

रत्नागिरी दि १३(प्रतिनिधी)- रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत या दहा दिवसापासून बेपत्ता होत्या. अखेर त्यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.या हत्येप्रकरणी त्यांचे पती रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकारी सुकांत सावंत उर्फ भाई सावंत याला अटक करण्यात आली आहे. सुरुवातीपासून पतीने तिच्यासोबत घातपात केल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

स्वप्नाली सावंत या रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती होत्या. कौटुंबिक कलहातून त्यांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गणेश चतुर्थीच्या रात्री सुकांतच्या मालकीच्या चाळीत तिघा आरोपींनी पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले होते. तसेच मृतदेहाची राख समुद्रात फेकून देण्यात आली होती. स्वप्नाली सावंत यांची आई संगीता शिर्के यांनी सुकांतला भेटून तिच्या बेपत्ता होण्याशी तुमचा काही संबंध आहे का, असे विचारले असता, त्याने कबुली दिली. पोलीसांनी सुकांत व्यतिरिक्त त्याचे दोन साथीदार रुपेश उर्फ छोटा सावंत आणि प्रमोद उर्फ पम्या गवनांग यांना देखील खून, पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून रोज थोडे थोडे पेट्रोल जमवून घटनेच्या दिवशी मृतदेह जाळण्यात आला. आणि मृतदेहाची राख समुद्रात फेकण्यात आली होती.त्यामुळे पोलीसांसमोर आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान होते. पतीवर संशय असल्याने पोलीसांनी त्या अँगलने तपास केल्यानंतर खरे सत्य समोर आले आहे. पोलीसांनी आरोपींना अटक केली असुन पुढील तपास सुरु आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!