Just another WordPress site

फडणवीस रशिया दाै-यावर जाताच महाविकास आघाडीचे नेते शिंदेंच्या भेटीला

फडणवीसांच्या त्या कृतीने शिंदे गटातील मंत्री आमदार अस्वस्थ, पुन्हा राजकीय नाट्य घडणार?

मुंबई दि १३ (प्रतिनिधी)- राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झालं. हे सरकार स्थापन करण्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांचीदेखील महत्त्वाची भूमिका होती. पण फडणवीस रशिया दौऱ्यावर गेले असताना राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू आमदाराने आज सह्याद्री अतिथीगृहावर हजेरी लावत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पण चर्चेचे कारण गुलदस्त्यात असल्याने राजकीय चर्चेला उधान आले आहे.

GIF Advt

शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या सहयाद्री अतिथीगृहावर बैठका सुरू असतांना तिथे येत भेट घेतली. प्रभू यांनी आपण सह्याद्री अतिथीगृहावर नेमकं का गेलो त्यामागील स्पष्टीकरण दिलं आहे. “MMRDA आणि MSRDCच्या आयुक्तांना भेटण्यासाठी मी आलो होतो. मात्र MSRDC च्या ब्रिजवर खड्डे आहेत. हे खड्डे बुजवावे ही मागणी मी केली आहे. मुंबई महाराष्ट्राला दुय्यम दर्जा देण्याचे काम हे सरकार करत आहे. महाराष्ट्राचे महत्व कमी केले जात आहे. ही गोष्ट निदर्शनास आणून देण्यासाठी त्यांनी भेट घेतल्याचे सांगितले.त्याचबरोबर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माजी मंत्री छगन भुजबळ, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील विकासकामांसाठी निधी देण्याबाबत चर्चा झाली. तसेच लम्पी आजारावर उपाय म्हणून पशूंसाठी लसीकरण लवकरात लवकर सुरु करावं, अशी मागणी करण्यासाठी ही भेट घेतल्याची चर्चा आहे. पण फडणवीस नसताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि ठाकरेंच्या विश्वासू आमदाराने शिंदेची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरीही फडणवीस यांची सरकारवर कमांड असल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी त्यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीत फटकारले होते. त्यामुळे शिंदे गटातील मंत्री आणि आमदार अस्वस्थ आहेत. हीच संधी साधत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे यांची भेट घेतली त्यावेळी विकास कामाबरोबरच राजकीय चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!