Just another WordPress site

देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्याला झापले

फडवीसांच्या हस्तक्षेपामुळे शिंदे गट अस्वस्थ, एकनाथ शिंदेंची बघ्याची भुमिका

मुंबई दि १३ (प्रतिनिधी) – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं असून आता मंत्रिमंडळाचाही विस्तारही झालं आहे . सरकार सत्तेवर आल्यापासून प्रसिद्धीसाठी मंत्र्यांनी घोषणांचा सपाटा लावला आहे .यावरून मंत्रीमंडळ बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उतावीळ मंत्र्यांना ताकीत दिली आहे .फडणवीसांचा रोख हा पूर्णपणे कृषिमंत्री अब्दूल सत्तार यांच्याकडे होता .

३० जूनला एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी झाला . तेव्हापासून हे सरकार नको त्या घटनांमुळेच चर्चेत आहे . केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्त्रीवर राज्यातही नवीन सन्मान योजना राबवन्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे , ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच सत्तारांनी माध्यमांकडे फोडली . यापुडे कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका , अशी सक्त ताकीत फडणविसांनी अब्दुल सत्तार यांच्यासह इतर मंत्र्यांनी दिली. सदा सरवणकर यांच्या गोळीबाराच्या प्रकरणामुळे तर शिंदे फडणवीसांची मोठी अडचण झाली आहे . आपण गोळीबार केलाच नाही असा दावा करणाऱ्या सरवणकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला , त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले .

GIF Advt

 

एखादया निणर्याला मंत्रिमंडळाने मंजुरी देणे किंवा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेणे महत्त्वाचे आहे . त्यामुळे यापुढे कोणत्याही मंत्र्यांने अशा सवंग घोषणा करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करा , परस्पर घोषणा करू नका . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे परस्पर घोषणा करणाऱ्या मंत्र्याची चांगलीच कोंडी झाली आहे .

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!