
लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापुर्वीच ‘तिला’ मृत्यूने गाठले
अहमदाबाद विमान अपघातात अनेकांची स्वप्नांची राख, सनईच्या सुराआधी रोशनीच्या घरी शोककळा
डोंबिवली – अहमदाबाद विमान अपघात २४२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २३० प्रवासी आणि १२ स्क्रू मेंबर होते. यात महाराष्ट्रातील १० जणांचा समावेश होता. यात सोशनी देखील होती. तिचे नुकतेच लग्न जमले होते. पण नियतीच्या मनात मात्र वेगळेच होते.
उच्चशिक्षित मुलाबरोबर रोशनीच्या रेशीमगाठी बांधल्या जाणार होत्या. येत्या नोव्हेंबरमध्ये साखरपुडा करून पुढील वर्षी मार्चमध्ये रोशनीचा विवाह करण्याचे नियोजन होते. मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या एका उच्चशिक्षित तरूणा बरोबर रोशनी सप्तपदी घेणार होती. पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला. रोशनी दोन वर्षांपासून एअर इंडियात कामाला होती. तिला एअर होस्टेस व्हायचे होते ते तिचे स्वप्न अधुरे राहिल्याची खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली. रोशनी या आधी स्पाईस जेट या विमान कंपनीत कामाला होती. लहानपणापासून तिला एअर होस्टेस व्हायचे होते, ते तिचे स्वप्न होते. आई राजश्री सोनघरे हिच्याशी ती अपघातापूर्वी सकाळी फोनवर बोलली होती. दुर्देवाने तेच तिचे शेवटचे संभाषण ठरले.
रोशनी ही एअर इंडियाची फ्लाइट अटेंडंट होती. रोशनीने तिचे ट्रॅव्हल व्लॉग, तिची युनिक स्टाईल अनेकांना आवडत होती. रोशनी इन्स्टाग्रामवर ५४ हजार फाॅलोअर्स आहेत. अपघाती विमानात रोशनी असल्याचे समजताच तिच्या चाहत्यांनी तिच्या खात्यावर जात शोक व्यक्त केला आहे.