
शेवाळवाडीत दोन बालमैत्रीणींच्या आत्महत्येने खळबळ
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, हडपसर पोलीसांकडून शोध सुरु
पुणे दि १४ (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील शेवाळवाडीत दोन बाल मैत्रिणींनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. एकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तिला रूग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेसमोर उडी घेत दुसरीने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकलेले नाही.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सानिका हरिश्चंद्र भागवत आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड अशी आत्महत्या केलेल्या दोन मैत्रिणींची नावे आहे. शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील क्रिस्टल सोसायटीत सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.आकांक्षा व सानिका या दोघीही मैत्रिणी होत्या. सात वाजण्याच्या सुमारास सारिका हिने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत सारीकाचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस सारिकाचा मृतदेह रुग्णावाहिकेमधून घेऊन जात असताना तिची मैत्रीण आकांक्षाने पहिले. आपल्या मैत्रिणीने आत्महत्या केल्याची तिला धक्का बसला.तिने त्याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावरन उडी घेतली आणि ती रुग्णवाहिकेजवळ पडली. यात तिचाही मृत्यू झाला.
दोन मैत्रीणींनी घेतलेल्या निर्णयामुळे शेवाळवाडी परिसरात एकच खळबळ उडाला आहे. दोन्ही मुलींच्या पालकांचा यामुळे जबर धक्का बसला आहे.दोघींनी आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.