Latest Marathi News
Ganesh J GIF

‘यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर साजरा होणार, तुम्ही तयारीला लागा’

ठाकरे शिंदे वादात नवा ट्विस्ट,दसरा मेळाव्यावरुन दोन्ही गट भिडणार?

मुंबई दि १४ (प्रतिनिधी)- सा-या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेला शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा ठाकरे घेणार कि शिंदे याची चर्चा सुरु असताना ”यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर जोरात साजरा होणार, लवकरच परवानग्या मिळतील, त्यामुळे तुम्ही तयारीला लागा” अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.त्यामुळे भविष्यात ठाकरे विरूद्ध शिंदे सामना रंगण्याची शक्यता आहे.

दसरा मेळाव्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आदेश देताना सांगितले की, “आपल्याला यंदा दसरा मेळावा जोरात साजरा करायचा आहे. आपल्याला लवकरच परवानगीही मिळेल त्यामुळे तुम्ही तयारीला लागा. मला एक वर्ष दसरा मेळाव्याची जबाबादारी दिली होती त्यावेळी मी मैदानात मुंगीही शिरणार नाही एवढी गर्दी जमवली होती. दसरा मेळावा शिवतीर्थावर जोरात साजरा होणार, त्यामुळे तुम्ही तयारीला लागा.अशा सुचना दिल्या आहेत. “आपल्याला सोशल मीडियावर बदनाम करत आहेत पण त्यांना कामानं उत्तर द्या कोणीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वागू नका. आपल्याला बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायचे आहेत. त्यामुळे टीकेला आपल्या कामातून उत्तरे द्या” असेही शिंदे म्हणाले आहेत. शिंदे आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला उत्तर देण्यासाठी २० ते ३० सप्टेंबर या कालावधीत हिंदुत्व यात्रा काढणार आहेत.त्याची सांगता दसरा मेळाव्यात केली जाण्याची शक्यता आहे.

दसरा मेळावा ५ आॅक्टोबरला होणार आहे.पण एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेनंतर महापालिका कोणाला परवानगी देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना कोणाची हे सांगताना दसरा मेळावा महत्वाची भुमिका बजावू शकतो त्यामुळे दसरा मेळाव्यावरुन दोन्ही गटातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!