‘पाहताक्षणी ‘ती’ बाला कलेजा खल्लास झाला’
आशिया कपमधील ही मिस्ट्री गर्लचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल
मुंबई दि १३ (प्रतिनिधी) – क्रिकेट हा फक्त खेळ राहिला नसून तो आता बहुआयामी झाला आहे. क्रिकेट सामन्यात जेवढी उत्सुकता खेळाडूंच्या खेळाची असते अगदीच तितकीच उत्सुकता प्रेक्षकांना कॅमेरामनच्या करामतीची असते कारण सामन्यातील हेरून सुंदर मुली ते दाखवत असतात सध्या आशिया कपमधील एक मिस्ट्री गर्ल चांगलीच चर्चेत आली आहे.
श्रीलंका आणि पाकिस्तानच्या मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंका विजयी झाली. त्याचवेळी हा सामना संपल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका मुलीचा आहे.तिला मिस्ट्री गर्ल असे नाव देण्यात आले आहे. मिस्ट्री गर्लची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ही मिस्ट्री गर्ल कोण आहे आणि कोणत्या संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. या तरुण चाहतीच्या रिॲक़्शन इतक्या क्यूट होत्या की तिची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केली आहे. अनेकांनी तर आपण फायनल मॅच फक्त या मुलीला पाहण्यासाठी पूर्ण पाहिल्याचे सांगितले आहे. सामना श्रीलंकाने जिंकला असला तरी क्रिकेट चाहत्यांना ह्रद्यावर या तरूणीने विजय मिळवला आहे. या मिस्ट्री गर्लला पाहिल्यानंतर चाहत्यांकडून सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

#AsiaCup2022Final #AsiaCupFinal #PAKvsSL
The only reason to watch full match🫶❤ pic.twitter.com/qutvpvLEYd— Ishtiaqueahmad98 (@Ishtiaq88467781) September 11, 2022
क्रिकेटच्या इतिहासात अनेक मिस्ट्री गर्ल्स पाहिल्या गेल्या आहेत. आयपीएल असो की आशिया कप, मॅचमधील अनेक मिस्ट्री गर्ल्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अनेकांचे आयपीएल पाहण्याचे एकमेव कारण त्या मिस्ट्री गर्ल असतात. त्यामुळे अनेकजण मनोमन त्या कॅमेरामनचे आभार मानत असतात. त्यामुळे अलीकडच्या काळात क्रिकेट सामन्या इतकीच चर्चा सामन्यात आलेल्या सुंदर ललनांची होत असते.