
खळ्ळ खट्याक होताच मग्रुर सुशील केडियांनी मागितली माफी
मनसैनिकांनी सुशील केडीयाचे कार्यालय फेडले, केडीयांचा माफीनामा आता मराठी शिकण्याचे आश्वासन(Video)
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी देणं उद्योजक सुशील केडिया यांना चांगलंच महागात पडले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईमधील केडिया यांच्या ऑफिसची तोडफोड केली आहे. यानंतर केडीया यांनी माफी मागत राज ठाकरेंची माफी मागितली आहे. तोडफोड झाल्यानंतर आक्रमक केडीया नरम झाले आहेत.
मनसे कार्यकर्त्यांनी केडिया यांच्या ऑफिसवर दगड आणि नारळ फेकले. केडियांच्या ऑफिसबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी पोलिसांनी या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मीरारोड येथे एका दुकानदाराने मराठी न बोलण्याने त्याला मारहाण करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आता एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीप्रेमींना डिवचणारं विधान केलं होतं. त्यानंतर अनेक मराठीप्रेमींनी राग व्यक्त केला होता. केडिया यांनी एक्सवर, मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा, असे एका पोस्टमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना टॅग करत म्हटलं होते. मनसैनिकांना केडीया यांना दणका देताच केडीया यांनी राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. ‘माझी चूक मला मान्य आहे. त्याबाबत मी खेद व्यक्त करत आहे. मी माफी मागतो. मला माफ करा, माझे वक्तव्य मागे घेतो. लवकरच मी मराठी भाषा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकेल. हे बिघडलेले वातावरण नीट करा. माझी चूक मला समजली आहे. ती सुधारू इच्छितोय. माझे ट्वीट तणाव आणि दडपणाखाली झाले’, असं सुशील केडिया म्हणाले आहेत. सुशील केडिया यांनी केलेले वक्तव्य फक्त भाषेसंबंधी नसून, मराठी अस्मितेवर केलेला थेट प्रहार असल्याचे अनेक नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मत आहे. महाराष्ट्रात राहून मराठी न शिकण्याचा गर्वाने उच्चार करणाऱ्यांबाबत जनतेमध्ये नाराजी आहे. माफी मागितली असली तरीही केडीया यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणोइ जोर धरू लागली आहे.
सुशील केडिया हे शेअर मार्केटशी निगडीत एक प्रसिद्ध आणि अनुभवी गुंतवणूकदार आहेत. ‘केडियोनॉमिक्स’ या आर्थिक सल्लागार कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ही कंपनी सेबी नोंदणीकृत असून, ट्रेडिंग व गुंतवणूक सल्ला देणारी संस्था म्हणून काम करते.