
वरातीत नवरीने अचानक असे काही केले की सगळे पहातच राहिले
नवरीच्या हटके कृतीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, नवरदेवानेही दिली साथ, साथीचा व्हिडिओ बघाच
मुंबई – लग्न आणि लग्नाचे व्हायरल होणारे व्हिडिओ याची नेहमीच चर्चा होत असते. अलीकडे लग्न खुपच खास झालेली आहेत. कारण लग्नात नवरदेव आणि नवरी डान्स करत एकमेकांना सरप्राईज देत असतात. सध्या सोशल मिडियावर असाच एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे.
विवाह म्हणजे फक्त दोन जीवांचा एकत्र येणं नाही, तर दोन कुटुंबं, दोन संस्कृती आणि दोन हृदयांचं मिलन असतं. जोडीदार जर मनासारखा मिळाला तर होणारा आनंद शब्दात मांडता येत नसतो. सध्या सोशल मीडियावर एक असाच खास लग्नाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये नवऱ्यानं आपल्या नवरीसाठी काहीसं हटके केलं आणि तो क्षण सगळ्यांच्या मनात घर करून गेला. व्हिडिओत दिसत आहे की, डीजेच्या तालावर घरातील सर्वजण नाचत आहेत आणि त्या गर्दीत नवरा आणि नवरी दोघंही मजेत सहभागी झाले आहेत. पण त्यातच अचानक नवरा नवरीला उचलून घेतो. यावेळी नवरी देखील खुपच खुश होते. आणि भन्नाट डान्स केला. नवरी एकदम गोंधळूनही गेली आणि खूप लाजली, पण तिच्या डोळ्यांमधून झळकणारा आनंद संपूर्ण दृश्यात उठून दिसत होता. नवरीचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील marathi_weddingz या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. काही महिन्यापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळालेले आहेत.
भारतातील लग्न म्हटलं की डान्स शिवाय अपूर्ण आहे. मग ती मिरवणूक असो किंवा क वधू-वर, लोकं जोरदार नाचतात. पण आजकाल नववधूही त्यांच्यात लग्नात भन्नाट नाचताना दिसतात. सध्या व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.