
चमचेगिरी करु नको, कानाखाली मारीन तुझा पगार कोण देते
महायुतीतील आणखी एका मंत्र्यांची ग्रामविकास अधिकाऱ्याला धमकी, व्हिडिओ व्हायरल, मंत्री म्हणतात....
जिंतूर – महायुती सरकारमधील काही मंत्री त्यांच्या वक्तव्यांमुळं वादात अडकलेले असतानाच मेघना बोर्डीकर यांचा व्हिडिओ समोर आला आहे. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्या मंचावरुन एका ग्रामसेवकाला धमकी देत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे मेघना बोर्डीकर विरोधकांच्या निशान्यावर आल्या आहेत.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कार्यक्रमातील व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला आहे. “याद राख ही मेघना बोर्डीकर आहे. तुला पगार कोण देतं? माझ्यापुढे अशी चमचेगिरी चालणार नाही. तू या गावात काय कारभार करतोस हे मला माहित नाही का? तुला आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकीन” चमचेगिरी कोणाची करायचे नाही, याद रख. तू काय कारभार करतो हे मला माहित नाही का? मी मुद्दामून सीईओ मॅडमला इथे घेऊन आले आहे. हमाली करायची ना तर सोडून दे नोकरी” असे म्हणत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भर सभेत परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ग्रामविकास अधिकाऱ्याला झापले आहे. बोरी सर्कल मधील १७ ग्रामपंचायतीतील प्रधानमंत्री ग्राम आवास योजना टप्पा दोन अंतर्गत, लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वितरण तथा लाभार्थी गृह प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात घरकुलाचे लाभार्थी मोठ्या संख्येने आले नाहीत. त्यामुळे चिडलेल्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बोरी ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. एकीकडे रमी खेळणारे मंत्री आणि दुसरीकडे सभेला लाभार्थी आणण्याचे टार्गेट पूर्ण न केल्यामुळे, ग्रामविकास अधिकाऱ्याला थेट कानाखाली लावून बडतर्फ करण्याच्या धमक्या देणारे मंत्री, मुख्यमंत्री फडणवीस कसे सांभाळू शकतात असा सवाल उपस्थित केला आहे.
बोरी येथील विधवा,मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी हा ग्रामसेवक छळ करतो, त्यांच्याकडं पैशांची मागणी करतो, अशी तक्रार होती. त्यामुळे मी एक पालक या नात्याने ग्रामसेवकाला ज्या भाषेत कळते त्याच भाषेत समज दिली. असे स्पष्टीकरण मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले आहे.