Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात देव दर्शनाला जाणाऱ्या पिकअपचा भीषण अपघात

महिलांची पिकअप १५० फूट दरीत कोसळली, सात महिला जागीच ठार, मृतांचा आकडा वाढणार?

पुणे – श्रावण सोमवार निमित्ताने कुंडेश्वर येथे दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांच्या पिकअप जीपला खेड तालुक्यात मोठा अपघात झाला. पाईट – कोहिंडे सीमेवर नागमोडी वळण असलेल्या घाट रस्त्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप थेट खोल दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत ७ महिला जागीच मृत्युमुखी पडल्या असून २१ हून अधिक महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जखमींवर चांडोली येथील ग्रामीण रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. २५ ते ३० महिला भाविक पिकअपमध्ये प्रवास करत होत्या, त्यामुळे वाहनाचा तोल गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. मृतांमध्ये शोभा ज्ञानेश्वर पापड, सुमन काळूराम पापड, शारदा रामदास चोरगे, मंदा कानिफ दरेकर, संजीवनी कैलास दरेकर,मिराबाई संभाजी चोरगे, बायडाबाई न्यानेश्वर दरेकर,शकुंतला तानाजी चोरघे यांचा समावेश आहे. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. रुग्णवाहिकांद्वारे जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्रावण महिन्याच्या तिसऱ्याया सोमवार निमित्ताने दर्शनासाठी भाविकांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली. खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना, नागमोडी वळणावर घाट चढताना गाडी रिटर्न आल्याने महिला भाविकांची पिकअप जीप पलटली, विशेष म्हणजे या पिकअपने ५ ते ६ पलटी खाल्ल्यानंतर ती रस्त्याच्या कडेला खाली कोसळली होती. या पिकअपमधून प्रवास करणाऱ्या त्यातील २५ ते ३० महिला भाविकांपैकी ७ महिलांचा मृत्यू झाला असून इतर महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

खेड पोलीस स्टेशनकडून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, रस्त्याची खराब अवस्था आणि वाहनचालकाचे नियंत्रण सुटणे यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!