Latest Marathi News
Ganesh J GIF

ब्रेकिंग! भाजपा आणि अजितदादांचा शिंदेंना धक्का

रायगडात अजितदादा तर नाशकात भाजपाची सरशी, महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी

मुंबई – भारताचा स्वातंत्र्य दिन समारंभ शुक्रवारी पार पडणार आहे. यासाठी कोणते मंत्री कोणत्या जिल्ह्यांत ध्वजारोहण करणार याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत एकनाथ शिंदे यांना धक्का देण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीतील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीस आणि अजित पवार यांची जवळीक वाढली आहे. तर एकनाथ शिंदे यांना सतत डावलण्यात येत आहे. सतत दिल्लीवारी करूनही अपेक्षित गोष्टी घडत नसल्यामुळे शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. त्यातच आता कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहन करणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण शिंदे यांनी प्रतिष्ठच्या केलेल्या रायगड आणि नाशिक जिल्ह्यात अनुक्रमे अजितदादा आणि भाजपाच्या मंत्र्यांना संधी देण्यात आली आहे. रायगडचं पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्यानंतरही आतापर्यंत रायगडात ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना देण्यात आला होता. रायगडात यंदाचा ध्वजारोहणाचा मान भरत गोगावलेंना मिळावा, अशी मागणी होत असताना 15 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यात मंत्री अदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत. तर, नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वजारोहण करणार आहेत. नाशिकममध्ये दादा भुसे यांचे पालमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.

ध्वजारोहण करण्यात येणा-या जिल्ह्याचे नाव आणि मंत्री

1. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे – ठाणे
2. अजित आशाताई अनंतराव पवार – बीड
3. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे – नागपूर
4. राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखेपाटील -अहिल्यानगर
5. छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ – गोंदिया
6. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चु पाटील -सांगली
7. गिरीश गिता दत्तात्रय महाजन – नाशिक
8. गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक – पालघर
9. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील – जळगांव
10. दादाजी रेश्माबाई दगडू भुसे – अमरावती
11. संजय प्रमीला दुलिचंद राठोड – यवतमाळ
12. उदय स्वरुपा रविंद्र सामंत – रत्नागिरी
13. जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल – धुळे
14. पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे – जालना
15. अतुल लिलावती मोरेश्वर सावे – नांदेड
16. डॉ. अशोक जनाबाई रामाजी वुईके – चंद्रपूर
17. शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई -सातारा
18. अॅङ आशिष मिनल बाबाजी शेलार- मुंबई उपनगर
19. दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे -वाशिम
20. आदिती वरदा सुनिल तटकरे – रायगड
21. शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले – लातूर
22. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे – नंदुरबार
23. जयकुमार कमल भगवानराव गोरे – सोलापूर
24. नरहरी सावित्रिबाई सिताराम झिरवाळ – हिंगोली
25. संजय सुशिला वामन सावकारे – भंडारा
26. संजय शकुंतला पांडूरंग शिरसाट – छत्रपती संभाजीनगर
27. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक – धाराशिव
28. मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील) – बुलढाणा
29. नितेश निलम नारायण राणे – सिंधुदुर्ग
30. आकाश सुनिता पांडूरंग फुंडकर – अकोला
31. प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर – कोल्हापूर
32. अॅङ आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल – गडचिरोली
33. डॉ. पंकज कांचन राजेश भोयर – वर्धा
34. मेघना दिपक साकोरे-बोर्डीकर – परभणी

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!