Latest Marathi News
Ganesh J GIF

राष्ट्रवादीचे योगेश ससाणे एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर

ससाणे हडपसरच्या 'या' पदाची आस,शिंदे गटाकडुन सकारात्मक प्रतिसाद

पुणे दि १६ (प्रतिनिधी)- महापालिका निवडणूकीआधीच पुणे महापालिका जिंकायची असा पण केलेल्या राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेले योगेश ससाणे एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. अगोदर ते भाजपात जाणार अशी चर्चा होती. पण यामुळे राष्ट्रवादीचे नुकसान होणार आहे.

माजी नगरसेवक योगेश ससाणेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडूनही पक्ष प्रवेशाची ‘ऑफर’ राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली असल्याची माहिती आहे. या दोघांमध्ये तब्बल तासाभर चर्चा झाली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ससाणे भाजपा व्यतिरिक्त शिंदे गटाची चाचपणी करत आहेत. योगेश ससाणे यांनी पहिल्यापासुन राजकीय वा-याचा अंदाज घेत राजकीय निर्णय घेतले आहेत. मोदी लाट असताना म्हणजे २०१४ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. तर २०१७ च्या महापालिका निवडणूकीच्या आधी राष्ट्रवादीत प्रवेश करत नगरसेवक पदाचे तिकीट मिळवले होते.ससाणे यांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत.पण हडपसरमधुन विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे असल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केल्यावर तिकीट मिळणार का याची चाचपणी केली होती. पण शिंदेच्या बंडानंतर तयार झालेल्या नव्या राजकीय समिकरणामुळे ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे चर्चा आहे. पण केसरकर यांच्यासोबतच्या भेटीत राजकीय मुद्यांवर चर्चा झालीच नाही. कोरोना काळात शालेय शुल्क माफीबाबत झालेल्या निर्णयांतील त्रुटी आणि त्याचा परिणाम यावरच बोलल्याचे सांगत ससाणे यांनी सस्पेन्स वाढवला आहे.

एकनाथ शिंदे गटाचे पुण्यातील नेतृत्व नाना भानगिरे यांच्याकडे आहे.त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदार यादीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आपल्याला हडपसर विधानसभेचे तिकीट मिळू शकते या शक्यतेवर ते शिंदे गटात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!