…तर बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेंची बिन पाण्याने केली असती
अजित दादांची बाळासाहेबांच्या 'त्या' भाषणाचा दाखला देत शिंदेवर टिका
जळगाव दि १६(प्रतिनिधी) – शिवाजी पार्कच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या उद्धवला सांभाळा असं म्हटलं होतं, त्यांनी आपल्या पुतण्यालाही दूर सारलं. शिवसैनिकांना आवाहन करताना आदित्य ठाकरेंनाही साथ देण्याचं वचन बाळासाहेबांनी घेतले होते. त्यामुळे आज बाळासाहेब हयात असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंची बिन पाण्याने त्यांनी केली असती, अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. या टीकेमुळे राजकारण होण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारने केलेली कामे वाचून दाखवताना शिंदेंच्या कारभारावर टिका केली. ते म्हणाले “फक्त स्वार्थासाठी शिवसेनेचे बंडखोर नेते भाजपला जाऊन मिळाले आहेत. त्यांचा स्वाभिमान वगैरे काही दुखावला गेला नाही. फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी ते तिकडे गेले आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांची आघाडी कायम असून अडीच वर्ष ज्या पद्धतीने महविकास आघाडी टिकवली, या दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या संकटांवर मात केली. यापुढील काळातही महाविकास आघाडी काम करेन मात्र याबाबतचे सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातील, आपण त्या पद्धतीने काम करु अन् भाजपला धडा शिकवूया, महाविकास आघाडी म्हणून निवडणुकांना सामोरे जाताना त्या त्या ठिकाणच्या जिल्ह्यांची परिस्थिती लक्षात घेऊन याबाबतचे निर्णय वरिष्ठ घेतील. तिघांच्या मतांची विभागणी न होता त्या दृष्टीने आगामी निवडणुकांमध्ये निवडणूक लढवू”असे अजित पवार म्हणाले आहेत.

यावेळी अजित पवारांनी संजय गायकवाड यांच्या हिंदीतील, ‘चुन चुन के मारेंगे’ या वक्तव्याची खिल्ली उडवली.गायकवाड यांचे वक्तव्य जसेच्या तसे जाहीर कार्यक्रमात म्हणून दाखवत अजित पवार यांनी आमदार गायकवाड यांची खिल्ली उडवली. यावेळी या आमदाराने हिंदी भाषेचा सत्यानाश केला असा टोला अजित पवार यांनी लगावला.