Latest Marathi News
Ganesh J GIF

एका मोठ्या व्यक्तीच्या शिफारशीमुळे घायवळला शस्त्र परवाना दिला

घायवळ शस्र परवाना प्रकरणात ट्वीस्ट, योगेश कदम यांच्यवर कोणत्या नेत्याचा दबाव, निलेश घायवळमुळे युतीतील हे तीन नेते अडचणीत

मुंबई – कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका होत आहे. पण आता योगेश कदम यांच्या वडील माजी मंत्री रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

रामदास कदम यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत मोठा दावा केला. आमदार अनिल परब यांनीही योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे. विधिमंडळात एका मोठ्या पदावर बसलेल्या, विधिमंडळात मंत्र्यांनाही आदेश देणाऱ्या व्यक्तीने योगेश कदम यांना सांगितले. तो व्यक्तीही न्यायाधीश आहे. म्हणून योगेश कदमने निर्णय घेतला. त्या व्यक्तीचे नाव मला घ्यायचे नाही. योगेश कदमने त्या व्यक्तीचे नाव मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. ती व्यक्ती उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे. अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर, त्यांनी शिफारस केल्यानंतर राज्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, असे रामदास कदम यांनी सांगितले आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांना मी कळवणार आहे. अशापध्दतीने राज्यमंत्र्यांना आदेश देणे, चुकीचे आहे. राज्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करणे चुकीचे आहे, म्हणून मी मुख्यमंत्र्यांना कळवणार आहे. हा निर्णय माझ्या मुलाने घेतला आहे. त्यामुळे मी नाव घेणार नाही. योगेश कदमच सांगतील. हा विषय त्यांचा आहे. याबाबत त्यांनी खुलासा केला आहे. मुख्यमंत्र्यांना नाव कळवले आहे. अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावे आणि नाव जाणून घ्यावे, असे रामदास कदम म्हणाले आहेत. पण तो व्यक्ती कोण अशी चर्चा आता रंगली आहे. निलेश घायवळ याच्यामुळे महायुतीतील नेते अडचणीत आले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रामदास कदम म्हणत असलेला तो बडा नेता कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्याकडून सभापती राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदार रोहित पवार यांनी सभापती राम शिंदे यांचे निलेश घायवळ सोबत जिव्हाळ्याचे संबध आहेत असा आरोप केला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!