Latest Marathi News
Ganesh J GIF

10 वर्षाची चिमुकली विहिरीवर धुवत होती कपडे, दोघांनी तिला इमारतीत उचलून नेलं ?

लहान चिमुरडी विहिरीवर कपडे धुवत असताना तिचं अपहरण करून तिला एका इमारीतीत नेलं आणि लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना आहे. संबंधित दोघेजण नराधम आपली ओळख कोणाला कळू नये म्हणून तोंड बांधून आले होते. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या घटनेनं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मथुरा येथील असल्याचे उघडकीस आले आहे. मगोरा पोलीस ठाण्यातील एका जंगली गावात 10 वर्षाची चिमुरडी विहिरीवर कपडे धुवत होती. दुचाकीवरून दोघेजण तरुण तोंडाला कापड लावून आले, त्यांनी चिमुरडीला उचलले आणि जवळच्याच एका इमारतीत नेले. तिच्या तोंडात बोळा कोंबला आणि तिच्यावर क्रूरपणे हल्ला करण्यास सुरुवात केली.

या घटनेनं ग्रामस्थ संतापून गेले आहेत. पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता, प्रकृती अगदीच चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सामुहिक लैंगिक शोषण प्रकरणात पोलीस संबंधितांचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच या प्रकरणाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलगी विहिरीवर कपडे धुवत होती. ही विहिरी गावाबाहेर होती. तेव्हा दोघेजण तोंडाला कापड बांधून आले. त्यानंतर तिला पाण्याचीही मागणी केली. त्यानंतर त्या तरुणांनी मुलीला जवळच्या इमारतीत नेलं आणि तोंडात बोळा कोंबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याचक्षणी काही कामगार सायकलवरून घरी येत असतानाच, त्यांना बघून हे दोघेजण तिथून पळून गेले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!