Latest Marathi News
Ganesh J GIF

अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अत्यंत मोठी अपडेट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. सकाळी 8.10 ला अजित पवार मुंबई विमानतळाहून VSR कंपनीच्या विमानाने निघाले.त्यानंतर 8.45 ला बारामती विमानतळाच्या शेजारी असलेल्या शेतात त्यांचे विमान कोसळले. या विमान अपघातानंतर मोठी खळबळ उडाली. धक्कादायक व्हि़डीओही पुढे आले. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजित पवार यांचे विमान एका बाजूला झुकताना स्पष्टपणे दिसले. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी चार दिवसात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांना शेवटचा निरोप देण्याकरिता लोकांनी मोठ्या संख्येने बारामतीकडे धाव घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंब एकत्र होते. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात अनेक गंभीर आरोप केली. VSR कंपनीवर थेट आरोप करताना रोहित पवार दिसले. सीआयडीच्या तपासावर रोहित पवार यांनी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोणत्याही परिस्थितीमध्ये VSR कंपनीच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. ज्याबद्दल आता मोठी अपडेट पुढे आली. VSR कंपनीचा मालक रोहित सिंह हा आज पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात पोहोचला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल रोहित सिंह याची चाैकशी केली जाणार आहे. रोहित सिंह हा भारत सोडून गेल्याचा दावा केला जात असतानाच आज तो पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात पोहोचला.

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अहवाल पुढे आला. मात्र, त्या अहवालाबद्दल अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केली आहेत. अजित पवार यांचा विमान अपघात नक्की कसा आणि कोणत्या कारणाने झाला, याबद्दल सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. आता सीआयडी चाैकशीत नक्की काय पुढे येते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अनेक तपास यंत्रणा अजित पवार यांच्या विमान अपघाताची चाैकशी करत आहेत.

 

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!