Latest Marathi News
Ganesh J GIF

सुनेकडून हवी होती ‘ती’ गोष्ट, नवऱ्यानेही तेच सांगितलं.. विवाहितेने सगळ्यांनाच दिला धक्का!

पंजाबच्या लुधियानामध्ये एका औद्योगिक शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पती आणि सासरच्या लोकांनी मिळून 30 वर्षीय विवाहितेचा छळ केला. याच छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं. मृत महिलेचं नाव पिंकी राणी असे आहे. तिचा मृतदेह हा घरात फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सासरच्या मंडळींनी विवाहितेला मुल जन्माला घालण्यावरून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे, याच त्रासाला कंटाळून महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासानंतर पोलिसांनी तिचा पती कुलविंदर सिंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या ताब्यात दिला होता.

वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, पिंकी राणीचा विवाह 2 ऑक्टोबर 2016 रोजी झाला होता. त्यांना दोन मुली देखील होत्या. मृताचा भाऊ नरिंदरने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, लग्नानंतर पीडितेच्या सासरच्या लोकांची वागणूक बदलली. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, तिचा पती कुलविंदर सिंग तिला मुलगा नसल्याने सतत त्रास देत असे, ज्यामुळे घरात दररोज वाद होत असत, या मानसिक त्रास आणि दबावामुळे रोजच्या छळाला कंटाळून पिंकीने आत्महत्या केल्याने टोकाचं पाऊल उचलले आहे.

हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर विवाहितेच्या माहेरील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचक्षणी काही पोलीस देखील तेथे आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुलविंदरविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!