Latest Marathi News
Ganesh J GIF

“बळजबरी केलीच नाही, तो तर विधीचा भाग”

खरातचा पोलिसांसमोर अजब दावा

अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या दुष्कृत्याचा पाढा आता वाचला जात आहे. २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या खरातची एसआयटी कडून कसून चौकशी सुरू आहे.तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतःला वाचवण्यासाठी खरात आता ‘विधी’ आणि ‘अध्यात्म’ या नावाखाली केलेल्या कृत्यांचे समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. खरातच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे.

चौकशीदरम्यान खरातने पोलिसांसमोर अत्यंत अजब दावे केले आहेत. “माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, ज्यांचे मी भले केले तेच आज माझ्यावर उलटले आहेत,” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. आता आपण यापुढे आपल्या मेंदूचेच ऐकणार असल्याचे त्याने म्हटले.भोंदूबाबा अशोक खरात याने १०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती आहे. अशोक खरात याने विधीच्या नावाखाली, महिलांच्या मनात भीती घालून, धमकी देत त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवले असल्याचा आरोप आहे. पोलीस चौकशीत मात्र, अशोक खरात याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावल्याची माहिती आहे. महिलांसोबत केलेले कृत्य हा विधीचाच एक भाग होता आणि आपण कुणावरही बळजबरी केली नाही, असा दावा त्याने केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!