Latest Marathi News
Ganesh J GIF

‘या’ तीन नेत्यांना खरातप्रकरणात सहआरोपी करा; खरातवरून दोन्ही राष्ट्रवादीत जुंपली

भोंदू बाबा अशोक खरातवरून आता दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आल्या आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यासह अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.

त्यावर अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. भोंदूबाबा खरातला पाणी दिलं त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील होते. जयंत पाटील यांचे भोंदू खरातसोबत असंख्य फोटो असल्याने आधी जयंत पाटलांनाच याप्रकरणात सहआरोपी करा, अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली आहे.विकास लवांडे गांडूळासारखी आपली वळवळ बंद करा. माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अत्यंत विस्तृतपणे भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर कडक कारवाई महायुतीचे सरकार करतोय गृहमंत्री म्हणून ते स्वतः लक्ष देऊन करताय त्याची संपूर्ण माहिती दिली. कॅप्टन अशोक खरात याला मदत करणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रत्येक व्यक्तीची चौकशी होईल व त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ही महायुतीच्या सरकारची आहे. चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा काल दिलेला आहे. निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे असे आनंद परांजपे म्हणाले.पुढे ते म्हणाले, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या बघायचं वाकून ही प्रवृत्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची राहिलेली आहे. पहिल्या दिवसापासून सातत्याने आरोप विकास लवांडे करण्यात आलेले असते, तर आज त्यांनी प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना सह आरोपी करा अशा प्रकारचा आरोप केला. मला तर ही शंका येते की त्यांचे युवा नेते आमदार रोहित पवारांच्या सांगण्यावरून त्यांनी हा आरोप केला नाही ना ? कारण जलसंपदा मंत्री असताना कोणाच्या आदेशाने ट्रस्टला पाणी दिले गेले कोण जलसंपदा मंत्री होत कोण मुख्यमंत्री होते. जलसंपदा मंत्री विकास लवांडेची त्यावेळेला जयंत पाटील होते आणि जयंत पाटील प्रांताध्यक्ष असताना अनेक त्यांचे फोटो आणि भेटी त्यावेळेला भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात कडे झालेले आहेत तर त्यांना देखील सह आरोपी करण्यात यावं.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!