
राज्यात सर्वत्र एकच नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे भोंदू बाबा अशोक खरात… त्यांच्याबद्दल आता नवीन अपडेट समोर आली आहे. भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार आहे.

यामध्ये महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. भोंदू अशोक खरात सोबत निगडित व्यक्ती आणि त्याच्या संस्थांच्या सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. परभणीच्या सेलू तालुक्यातील खवणेपिंपरीमध्ये रुही इंडियन गॅस एजन्सी मधून 56 गॅस सिलेंडर चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे. पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे. या प्रकरणात शिक्षण विभागात अशीही चर्चा आहे की, तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मध्यस्थी करत हा आयडी मिळवून देण्यात आला. त्यामुळे दिलीप खरातचा शालार्थ आयडी खरा की बोगस, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय अशोक खरातने आपल्या राजकीय वजनाचा वापर करून शिक्षण विभागातील अनेक फाईल्स पास केल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.


